हुतात्म्यांच्या विचारांवर अन्यायाविरुद्ध क्रांती लढा उभारण्याची गरज

मनोहर बोरकर
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ग्रामसभांची वीर बाबुराव शेडमाके यांना शहीद दिनी आदरांजली

एटापल्ली : सुरजागड़ पहाड़ी परिसरात वीर बाबुराव शेडमाके शहीद दिनाचे कार्यक्रम प्रसंगी शासन व प्रशासनकडून आदिवासीवर होणारे अन्याय अत्याचार विरुद्ध वीर शहीदांच्या विचारावर आधारित क्रांती लढ़ा उभरण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता महेश राऊत यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्य सेनानी शहीद वीर बाबुराव  शेडमाके यांचे वास्तवाचे प्रतिक तालुक्यातील प्रशिद्ध सुरजागड़ लोहखनिज पहाड़ी परिसरात शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत (ता21) शनिवार रोजी शहीद दिन साजरा करुन शहीद बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेल जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा यांचे हस्ते पुष्प हार घालून आदरांजली वाहण्यात आली यावेळी मार्गदर्शन करतांना राऊत यांनी वीर बाबुराव शेडमाके यांचे जीवन चरित्राचा आधार घेत जे कष्ट सहन करुण बाबुराव शेडमाके, बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, अशा योद्धयांनी प्राणाची आहुती देवून अन्यायकारी इग्रजांपासून समाजाचे रक्षण केले तीच वेळ आता साम्राज्य वादी शासक व उद्योजक यांचे अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याची आली असुन मोहंदी व गुडजुर गावांतील अत्याचार पीड़ित महिला व पुरुषांना न्याय मिळण्यास जन आंदोलन उभरण्याची आवश्यकता असल्याचे मत राऊत यांनी व्येक्त केले.

यावेळी पंचायत समिती सभापती बेबी लेकामी, जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा, पंचायत समिती सदस्य शिला गोटा, सरपंच कल्पना आलाम, पोलिस पाटील कन्ना गोटा, एडव्होकेट जगदीश मेश्राम, सैनु हिचामी, नगरसेवक तान्या दूर्वा, इत्यादींनी समायोचित मार्गदर्शन केले लोहखनिज उत्खनन करण्यास विरोध, अवैध दारू, सुगंधित तंबाखूवर प्रतिबंद, शिक्षण, आरोग्य, न्याय, हक्क, मूलभूत व भौतिक सोयी सुविधा इत्यादी मागण्या शासन स्तरावर ग्रामसभांच्या माध्यमातून पोहचविण्यात याव्या असे ठराव यावेळी सम्मत करण्यात आले त्यामुळे ग्रामसभांच्या वतीने काही दिवसात तिव्र आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे.