लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात; दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सोमवारला दुपारी 3 वाजता दरम्यान चंद्रपुरला जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. यात जखमी चालक व वाहकाला पोलिसांच्या मदतीने अहेरी तेथील उपजिल्हा रूगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाड़ीवरील लोह खनिज उत्खनन करुण लॉयल्डस मेटल कंपनीच्या चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस येथील उद्योगाला खनिज पुरवठा करणाऱ्या ट्रकला येलचिल पहाड़ीवर झालेल्या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहेत.

वादग्रस्त सुरजागड़ पहाडीवरील लोहखनिज उत्खनन व वाहतुक करण्यास नक्षल संघटनेसह स्थानिक विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व ग्रामसभांचा प्रखर विरोध आहे. गेली दोन वर्षात पक्ष संघटनांची आंदोलने व डिसेंबर 2016 मध्ये नक्षल्यांकडून दिवसाढवळया 81 वाहनांची जाळपोळ झाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दल व जिल्हा पोलिस विभागाचे सुरजागड़ पहाडी परिसरातील हेडरी या गावी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय उघडून ऑक्टोंबर 2017 पासून हजारो पोलिसांच्या सुरक्षेत लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. मात्र यावरील चालक व वाहक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवित असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे असे अपघात होत असल्याचे बोलल्या जात आहे. 

सोमवारला दुपारी 3 वाजता दरम्यान चंद्रपुरला जाणाऱ्या ट्रकला अपघात झाला. यात जखमी चालक व वाहकाला पोलिसांच्या मदतीने अहेरी तेथील उपजिल्हा रूगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Gadchiroli news accident in attapalli