आंदोलक महिलांवर अन्याय करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

मनोहर बोरकर
रविवार, 30 जुलै 2017

7 नोव्हेंबर 2016 रोजी क्षमतेपेक्षा जादा लोह खनिजाची चाळीस ट्रक मधून वाहतूक केली जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी जनहितवादी समितीकडे करण्यात आली. त्यावरून समितीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी खनिज वाहतूक करणारे वाहनांची रितसर तक्रार तहसीलदार संपत खलाटे यांना करुण समक्ष हजार राहून वाहनांची तपासणी करुण जप्तिची कार्यवाही करण्यात आली होती.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : येथील जनहितवादी युवा समितीच्या महिला कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंद करणारे व अवैध व्यवसायिकांना पाठीशी घालनारे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांचे कर्तव्य काळाची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका महिला आघाडी प्रमुख रेणुका बोरुले यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दळवी हे अवैध सुगंधित तंबाखू व दारू तस्करांना मदत करीत असल्याच्या या अगोदर जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी केल्या होत्या. मात्र कार्यवाही झाली नाही हे विशेष बोरुले यांनी निवेदनात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे सुरजागड़ पहाड़ीवरील लोह खनिज उत्खनन करणारी लॉयल्डस मेटल कंपनीच्या बिना टी पी अवैध वाहतूक, रस्ता निर्माण कार्य व अवैध वृक्ष तोड इत्यादी गैरकारभारास तसेच महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू व अवैध दारू माफियांना प्रोत्साहन देवून सहकार्य करीत असल्याचा आरोप केला आहे.

7 नोव्हेंबर 2016 रोजी क्षमतेपेक्षा जादा लोह खनिजाची चाळीस ट्रक मधून वाहतूक केली जात असल्याची तक्रार काही नागरिकांनी जनहितवादी समितीकडे करण्यात आली. त्यावरून समितीच्या काही महिला कार्यकर्त्यांनी खनिज वाहतूक करणारे वाहनांची रितसर तक्रार तहसीलदार संपत खलाटे यांना करुण समक्ष हजार राहून वाहनांची तपासणी करुण जप्तिची कार्यवाही करण्यात आली होती. यात माझा कोणताही सहभाग नसतांना जनहितवादी समितीच्या आंदोलक महिला कार्यक्रत्यासह माझ्यावर दळवी यांनी खोटे गुन्हे नोंद केले असुन पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांचे एटापल्ली पोलिस स्टेशन मधील संपूण कर्तव्य काळाची चौकशी करुण कठोर कारवाहीची मागणी बोरुले यांनी केली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :