आईला मारहाण करणाऱ्यास लोकांचा चोप; बेशुध्द अवस्थेत रुग्णालयात दाखल

मनोहर बोरकर
सोमवार, 3 जुलै 2017

बेदम मारहाण करून तो बेशुध्द पडल्यानंतर मारहाण करणाऱ्या नागरिकांनी पोबारा केला. ​

एटापल्ली : येथील शिवाजी चौकात बुकलू पेका तुमरेटी (वय 45) हा क्षुल्लक कारणावरून आपल्या आईशी वाद घालून तिला मारहाण करीत असल्याचे काही नागरिकांना लक्षात आले. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणाचेही ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला बेदम मारहाण करून तो बेशुध्द पडल्यानंतर मारहाण करणाऱ्या नागरिकांनी पोबारा केला. 

बुकलू हा बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत बुकलू याला ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तो सुरजागड येथील मूळचा राहणारा आहे. पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​