'राज्यमंत्री आत्राम यांचा दौऱयावेळी बहिष्कार टाकला नाही'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

जिल्हा उपाध्यक्ष गंपावार यांचे स्पष्टीकरण
एटापल्ली (गडचिरोली): आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम एटापल्ली तालुका दौरावर असताना कोणीही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याने त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला नसल्याचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार यांनी पत्राने 'सकाळ'ला कळविले आहे.

मंत्री आत्राम हे तालुक्यात प्रवेश झाल्या बरोबर वनोपज नका जवळ भाजपा पक्षाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मंत्री आत्राम यांचे उपस्थितीत झालेला नगरपंचायत मधील स्वागत व सत्कार समारंभ, हनुमान मंदिर परिसरातील कार्यकर्त्ता मेळावा व ग्रामीण रुग्णालय भेट यावेळी मात्र गंपावार व इतर कार्यकर्ते अनुपस्थित होते हे विशेष.

संबंधित बातमीः
आमदार आत्राम यांचा तालुका दौरा वादग्रस्त

टॅग्स