गडचिरोलीः एटापल्लीच्या चौकात लागले नक्षल बॅनर

मनोहर बोरकर
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

एटापल्ली (गडचिरोली): येथील वन उपज नाक्यावरील शासकीय योजनांची माहिती प्रसिद्ध केल्या जाणा-या फलकावर अन्यायविरुद्ध कठोर युद्ध पुकारा व माओवादी संघटना स्थापना दिन 21 ते 27 सप्टेंबर साजरा करा, असा मजकुर लिहिलेले बॅनर लावल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

चोवीस तास वर्दळीचे ठिकाण असलेल्या एटापल्ली-अहेरी व सुरजागड़ गट्टा असा त्रिकोणी चेकिंग नाका चौकात शासकीय योजनांची माहीती प्रसिद्ध करण्यास फलक लावलेला आहे. याच फलकावर गुरुवारी (ता. 21) रात्री 9च्या दरम्यान नक्षल्यांनी बॅनर लावला. या आठवड्यात गट्टा येथील भुसुरुंग स्फोट, पोलिस नक्षल चकमक, सुरजागड़ पहाड़ी परिसरात पोलिसांकडून शक्तिशाली स्फोटके निकामी करने व बॅनर-पोस्टर बाजीने तालुक्यात दहशत पसरली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :