भामरागड तालुक्‍यात शंभर गावांचा संपर्क तुटला; दोन जण गेले वाहून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

पर्लकोटा नदीला पूर; दोन जण पुरात वाहून गेले; बाजारपेठेतही घुसले पाणी

गडचिरोली: सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्‍यातील शंभर गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. देसाईगंज व मुलचेरा तालुक्‍यात दोन जण पुरात वाहून गेल्याची माहिती आहे.

भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला सोमवारच्या रात्री पूर आला. पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील बाजारपेठ व निवासी घरे पाण्याखाली बुडाली आहेत. पुरामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. देसाईगंज येथे मासेमारी करण्यासाठी गेलेल्या विनोद शंकर कांबळे (वय 35) याचा नाल्याच्या पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली. मंगळवारी सायंकाळी मक्केपल्ली येथील ऋषी तुंकलवार (वय 60) हे नाल्याच्या पुरात वाहून गेले.

दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे 21 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून 2126 क्‍यूसेस पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्हातील अनेक भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे. पर्लकोटा नदीच्या पुरामुळे येथे मुक्कामी असलेल्या महामंडळाच्या नागपूर व गडचिरोली बसेस अडकून पडल्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :