गडचिरोलीत भोपळ्याच्या आकाराचे लिंबू!

- मिलिंद उमरे
शनिवार, 28 जानेवारी 2017

राजेश इटनकर यांनी शेतीत साकारला ऍग्री-इको टुरिझम प्रकल्प
गडचिरोली - येथे संत्री किंवा नारळच नाही, तर चक्‍क भोपळ्याच्या आकाराचे लिंबू आणि सफरचंदाच्या आकाराची बोरं पिकतात. ही सारी कमाल आहे निसर्गावर भरभरून प्रेम करणारे राजेश इटनकर यांची. येथील गडचिरोली-आरमोरी मार्गावरील अडीच एकर शेतातील "आय-फार्म' हा त्यांचा प्रकल्प ऍग्री-इको टुरिझमचे उत्तम उदाहरण आहे.

इटनकर यांनी 2010 मध्ये अडीच एकर शेती विकत घेतली. त्यांनी वनविभागाकडून लिंबाची काही रोपे विकत घेतली. सोलान प्रजातीचे हे अतिदुर्मिळ लिंबू असून याचा आकार भोपळ्याइतका असतो. आज त्यांच्या शेतात मोठे लिंबू झाडाला लटकली आहेत. त्यांच्याकडे स्वित्झर्लंड ऍपलची चव असलेले बोरांचे वृक्ष आहेत. त्यांचा आकारही फरचंदाइतकाच आहे. या शेतात 16 प्रजातींची आंब्याची झाडे आहेत. आंब्याचे वृक्ष तीन ते चार फूट उंचीचे आहेत. त्यांचे आय-फार्म बघायला देशभरातून पर्यटक येत आहेत. येथे पर्यटकांना रेनडान्ससाठी विशेष फवारे आहेत. इटनकर यांच्या शेतात दोन प्रकारचे फणस, दोन प्रकारचे चिकू, ऍपल बोर, जांभूळ, सीताफळ, करवंद, शेवगा, लिंबू, नारळ, केळी अशी अनेक फळझाडे व अन्य वृक्ष आहेत.

पशुपक्ष्यांचा लळा
श्री. इटनकर यांना पशुपक्ष्यांचाही लळा आहे. त्यांनी ससे, बदक, राजहंस, लव्हबर्डसचे प्रजोत्पादन सुरू केले आहे. त्यांच्या या शेताची भुरळ वन्यजीवांनाही पडली आहे. त्यामुळे रानातले मोर, चितळ, कोल्हे, लांडगेसुद्धा इथे येतात. त्यांच्यासाठी खास पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांनी येथेच उच्च प्रजातीच्या कुत्र्यांचे व घोड्यांचे प्रजनन केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Gadchiroli pumpkin-sized lemon!