पंधरा लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नागपूर - छत्तीसगडमधून महाराष्ट्रमार्गे गुजरातमध्ये गांज्याची तस्करी करणारे वेंकटकुमार रमण (वय २७, जि. सूरजपूर, छत्तीसगड) आणि सुशील चंद्रा (२४, जि. बलोदाबाजार, छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली. तर, केसर अग्रवाल, प्रीतराम खुटे आणि त्यांचा चालक हे अद्याप फरार आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख रुपयांचा गांजा जप्त केला. 

कळमन्यात १ सप्टेंबरला गांजा तस्करीची घटना उघडकीस आली. त्या प्रकरणात संतोष खुटे (वय ३१, कोरबा, छत्तीसगड) याला छत्तीसगडमधून अटक केली. त्याच्याकडे ११ सीम कार्ड मिळाले. सायबर सेलच्या मदतीने त्याचे लोकेशन गुजरात आणि छत्तीसगड परिसरात आढळले. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री छत्तीसगडवरून दोन कार गुजरातला गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांना मिळाली. हिंगणा मार्गावर सापळा रचून दोन्ही आरोपींना कारसह अटक करण्यात आली.  

मुख्य आरोपीने दिला गुंगारा
छत्तीसगडच्या गाडीची नंबरप्लेट बदलवून महाराष्ट्र पासिंगची बनावट नंबरप्लेट कारला लावली. ती कार कळमना मार्गाने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लगेच कळमना पोलिसांना बॅरिकेटिंग करण्याच्या सूचना दिल्या. ते आरोपी कारने बॅरिकेटिंग तोडून पळून गेले. मुख्य आरोपी पसार झाला. 

Web Title: ganja seized in nagpur