'विकृत मानसिकेतेशी मुलींने दोन हात करणे शिकावे'

Girls should learn to have fight with perverse mentality person
Girls should learn to have fight with perverse mentality person

अकोला (तेल्हारा) : जिल्ह्यात जननी 2 महीला सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राकेश. कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असुन आज तेल्हारा पो.स्टे. तथा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत माहेश्वरी भवन तेल्हारा येथे महीला सुरक्षा अभियान पार पडले. यावेळी तेल्हारा ठाणेदार विकास देवरे बोलत होते. विकृत प्रवृत्तीच्या मानसिके विरुध्द दोन हात करुन स्वताच्या सुरक्षेकरीता या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी, शांताबाई पथनाट्याचे सादरीकरण करुन महीला कशा समस्याग्रस्त आहेत. याकडे लक्ष वेधले दुसरीकडे मात्र कायदा सक्षम असतांना अविचारी मानसिकतेतुन महीलांचे शोषन करतांना दिसत आहेत शांताबाई या पथनाट्याव्दारा खुन झाला खुन झाला आणखी एक खुन झाला पथनाट्याव्दारे महीलांच्या ज्वलंत समस्येवर सादरीकरण करुन महीलांच्या सुरक्षेविषयी पथनाट्यातून सादरीकरण केले यावेळी अकोला येथील कराटे प्रशिक्षक अरुण सेनसाय तथा महीला पोलीस प्रशिक्षक खुशबू चोपडे, यांनी महीला पोलीस कराटे टीमकडुन महीलांच्या बचावा करीता प्रात्यक्षिके सादर केले येत्या काळात तेल्हारा तालुक्यातील विविध गाव शहरांमध्ये अश्या सुरक्षा अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यात येईल यावेळी महीला मुली यांनी आपली तक्रार 1091 क्रंमांकावर करावी असे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र महीला काँग्रेस कमेटीच्या डा़ँ.संजीवनीताई बिहाडे यांनी उपस्थित महीलांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या मनिषा देशमुख यांनी पोलीस विभागाने चालविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी महीला सुरक्षा समिती सदस्य ज्योतीताई राठी, रिपांई महिला नेत्या संगीता परघरमोल मा. वि. मच्या कोल्हे मँडम यांच्यासह तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे तथा हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार, हे. कॉ. गणपतराव गवळी नागोराव भांगे, गुप्त विभागाचे अनंत चिंचोलकर हिवरखेड पोलीस स्टेशनचे राजु इंगळे यांनी या कार्यक्रमाकरीता योगदान दिले. यावेळी महीला मुली विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com