चण्याच्या शासकीय खरेदीत शेतकऱ्यांची थट्टा; शिल्लक माल ठेवण्याचा मोठा प्रश्न 

government are not buying chickpeas properly from farmers
government are not buying chickpeas properly from farmers

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे चणा उत्पन्न हेक्‍टरी 25 क्विंटल आहे. मात्र, जिल्ह्यातील खरेदीची मर्यादा हेक्‍टरी दहा क्विंटल आहे. शासकीय चणा खरेदीत शेतकऱ्यांची थट्टा होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

आर्णीत बारदाना नसल्याने चणा खरेदी बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा करावी लागली. आता शासकीय खरेदी सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील शासकीय चणा खरेदीची हेक्‍टरी दहा क्विंटलची मर्यादा आहे. एकरी आठ ते दहा क्विंटल पिकलेल्या चण्याची हेक्‍टरी दहा क्विंटल अशी खरेदी सुरू आहे. म्हणजेच उत्पन्न झालेल्या चण्यापैकी निम्मीच शासकीय खरेदी होत आहे. तर निम्मा चणा खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. 

आर्णी शहरालगत असलेल्या सातारा फाट्यासमोर खासगी बाजार समितीत ही शासकीय चणा खरेदी सुरू आहे. मागील वर्षी चणा खरेदीची मर्यादा ही हेक्‍टरी 18 क्विंटल इतकी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याप्रमाणे विक्रीसाठी चणा नेला. परंतु यावर्षी यात कपात करण्यात आली आहे. अर्थात ही कपात निम्म्यावर आणली आहे. यावर्षी रब्बी हंगामात चणा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढली आहे. अशा कारणांमुळे भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदीत चणा विक्री करणे परवडते. 

हेक्‍टरी दहा क्विंटल खरेदीची अट शेतकऱ्यांची थट्टा करणारी ठरत आहे. आता शिल्लक असलेला चणा बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बारदाना नसल्याने चणा खरेदी बंद होती. त्यामुळे शासकीय खरेदीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली. आता शासकीय खरेदी सुरू झाली तर ही शासकीय खरेदीची हेक्‍टरी मर्यादा शेतकऱ्यांना जाचक ठरत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

1,692 शेतकऱ्यांची नोंदणी

शासकीय चणा खरेदीसाठी 1,692 शेतकऱ्यांनी नोंदणी कली. त्यापैकी 400 शेतकऱ्यांना एसएमएस करण्यात आले. 1,692 शेतकऱ्यांपैकी 120 शेतकऱ्यांनी चणा विक्रीला आणला. 27 मार्च ते पाच एप्रिलपर्यंत एकूण 1,692 क्विंटल चणा शासकीय खरेदी झाली आहे.

शेतातील दोन हेक्‍टर क्षेत्रावर चणा लागवड केली होती. त्यात 37 क्विंटल चणा पिकाचे उत्पन्न झाले. शासकीय खरेदीची हेक्‍टरी दहा क्विंटलची मर्यादा असल्याने माझ्याकडे 17 क्विंटल चणा घरी शिल्लक आहे. बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भाव आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करवे लागते.
-संतोष पाटील
शेतकरी, लोणी ता. आर्णी

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com