आमच्याच योजनांवर या सरकारचे शिक्कामोर्तब  - वसंत पुरके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

अमरावती - योजना आम्ही आखल्यात हे सरकार त्यावर केवळ शिक्के मारण्याचे काम करीत आहे. कायम विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कायम हा शब्द काढण्याचे काम आमच्या काळात झाले, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. 

अमरावती - योजना आम्ही आखल्यात हे सरकार त्यावर केवळ शिक्के मारण्याचे काम करीत आहे. कायम विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील कायम हा शब्द काढण्याचे काम आमच्या काळात झाले, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी केले. 

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचे नामांकन दाखल करण्यासाठी वसंत पुरके अमरावतीस आले होते. नामांकनापूर्वी संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रात राज्याला सतराव्या क्रमांकावरून तीनवर आणण्यात आमचे श्रम आहेत. शिक्षणमंत्री असताना दर्जात्मक प्रगतिपथावर नेण्याचे काम आम्ही केले. त्याचे श्रेय लाटण्याचा या सरकारचा डाव असून तो पदवीधर व शिक्षकांनी ओळखण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांवर लाठीमार करणारा व शिक्षकांसह पदवीधरांसदर्भात नकारात्मक धोरण ठेवणाऱ्या सरकारचा उमेदवार तुम्हाला चालणार आहे का? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

मेळाव्याचे अध्यक्ष व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी परिषदेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची शक्ती अधिक असल्याने पदवीधर व शिक्षकांचे प्रश्‍न आघाडीच मार्गी लावू शकतात. त्यामुळे भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले. पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय खोडके यांनी शिक्षक व बेरोजगारांच्या प्रश्‍नावर संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यास आपण पक्ष विसरून त्यांच्यासोबतच राहू ,असे आश्‍वासन दिले. 

मेळाव्यास पाचही जिल्ह्यातून आजी-माजी आमदार, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी तसेच विविध शिक्षक संघटना, कर्मचारी संघटना, पदवीधर संघटना, शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी संघटना, आयटीआय निदेशक, संघर्ष व कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The government plans to seal our - vasant purke