कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नरसाळा - लाठ्या, गाठ्यांनी मारहाण करण्यासह दगडाने ठेचून कुख्यात गुंड बाल्याकमची ऊर्फ गोवर्धन शेंडे (३२, रा. श्रेयशनगर) याची हत्या करण्यात आली. शुक्रवारी रात्री नरसाळ्यातील श्रेयशनगरात ही थरारक घटना घडली. बाल्याकमची दोन हत्याकांडांमधील आरोपी होता. दोन महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता.

आईचा मृत्यू झाल्यामुळे बाल्या व वडील शालिकराम दोघेच सोबत राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असून, सोबतच दारू ढोसत होते. शुक्रवारी रात्री दोघांसोबत बाल्याचा मित्र असे तिघे घराजवळीलच मोकळ्या भूखंडावर दारू ढोसत बसले होते. त्याचवेळी वीज गेली. अंधारात कुणीतरी त्यांच्या दिशने दगड फेकला. चिडलेला बाल्या थेट उठला आणि दगड फेकणाऱ्याच्या शोधात रस्त्यावर आला. त्याचवेळी तीन ते चार आरोपींनी लाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळून बाल्या रस्त्यावर कोसळला. आरोपींनी दगड उचलून त्याचा चेहरा ठेचून काढला. आरडाओरड ऐकून शालिकराम व मित्र धावले. तोवर हल्लेखोर पसार झाले होते, तर बाल्या निपचित पडला होता. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्‍वर ठाण्याचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत कंगारूला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू केली आहे.

कारण अस्पष्ट
बाल्याकमचीच्या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. त्याने २०१५ मध्ये ड्रममधून पाणीचोरत असल्याच्या संयशातून शेजारच्याच युवकाचा खून केला होता. याच प्रकरणात तो कारागृहात होता. त्यापूर्वी २०१३ मध्येसुद्धा त्याने वस्तीतीलच व्यक्तीचा खून केला होता. या घटनांचा बदला म्हणून बाल्याची हत्या झाली असावी अशी चर्चा परिसरात आहे.

Web Title: gund murder crime