अकोल्यात हवालाचे 16 लाख रुपये जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

अकोला - गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुना कपडा बाजारात संतोष प्रल्हादराव जवादवार (रा. आखाडा बाळापूर, जि. हिंगोली) याच्याकडे 15 लाख 64 हजार रुपयांची रोकड आढळली. या पैशांबाबत संबंधिताला विचारणा केली असता, त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर यांना जुना कापड बाजारात एका व्यक्तीकडे 15 लाख 74 हजार रुपयांची रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यावरून जवादवार यांची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख आढळली. हे पैसे आदिनाथ ट्रेडर्स या दुकानात आणण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी जवादवार व दुकान मालकाची कसून चौकशी केली. त्या दोघांच्याही जबाबात तफावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.