मसाज करायला आला अन्‌ बलात्कार करून गेला! 

crime
crime

नागपूर : ब्युटीपार्लरमध्ये मसाज करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने ब्युटी पार्लरमधील युवतीवर बलात्कार केला. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून नागपूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर गिट्टीखदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. उज्वल सुरेश ठाकरे (32, रा. जलालखेडा, जि. नागपूर) असे नराधम पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 29 वर्षीय युवती उच्चशिक्षित असून नोकरी न मिळाल्यामुळे तिने ब्युटी पार्लर टाकले. गेल्या पाच वर्षांपूर्वी आरोपी पोलिस कर्मचारी उज्ज्वल ठाकरे हा ब्युटीपार्लरमध्ये फेस मसाजसाठी आला होता. तेव्हा दोघांची ओळख झाली. तो ब्युटी पार्लरमध्ये वारंवार मसाजसाठी येऊ लागला. दरम्यान त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. दोघांची मैत्री झाली. 16 मे 2013 मध्ये तो ब्युटी पार्लरमध्ये आला. सायंकाळची वेळ असल्यामुळे पार्लरमध्ये कुणीही नव्हते. त्याने मसाज करीत असताना तिच्यावर बलात्कार केला. पोलिस असल्याचा धाक दाखवून कुणालाही न सांगण्यासाठी दमदाटी केली. तेव्हापासून तो वारंवार ब्युटी पार्लरमध्ये येऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिने लग्न करण्याचा तगादा लावला तेव्हा आरोपीने तिला टाळणे सुरू केले. याप्रकरणी फिर्यादीने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवला. 

ती झाली होती त्रस्त! 
पोलिस कर्मचारी उज्ज्वल ठाकरेच्या बळजबरीमुळे पिडीत युवती त्रस्त झाली होती. मात्र, नकार दिल्यानंतर तो वर्दीचा धाक दाखवत होता. शेवटी त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. तब्बल पाच वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतरही तो लग्न करण्यास टाळाटाळ करीत होता. दुसऱ्या कुणाशी लग्न ठरवूसुद्धा देत नव्हता. त्यामुळे तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. 

फेसबूकमुळे फुटले भांडे 
उज्ज्वल ठाकरेने गेल्या काही दिवसांपूर्वीच वर्धा येथील एका युवतीशी गुपचूप साक्षगंध केले. साक्षगंधाचे फोटो फेसबूकवर अपलोड केले. त्या फोटोत या युवतीलाही टॅग केले. त्यामुळे तिने चिडून वर्धा गाठून उज्ज्वलच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली आणि सर्व हकीकत सांगितली. त्या युवतीनेही उज्ज्वलशी लग्न करण्यास नकार दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com