वादळी वाऱ्याचा तडाखा लिंबूचे लाखोंचे नुसकान

Heavy rain and air destroy lemon farm
Heavy rain and air destroy lemon farm

पातुर : बुधवार २० जून च्या सायंकाळी पातुर तालुक्यातील काही भागात झालेल्या तुफान वादळी वारा, विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊसाच्या धारा यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अस्मानी संकटालाही सामोरे जावे लागले आहे.  २० जूनच्या सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने परत अकोला जिल्ह्यातील काही भागातील शेतीमधील पिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्याने सायंकाळी पातूर तालुक्यात चांगलेच थैमान घातले. झाडांची पडझड, काहींच्या घरावरील टिनपञे उडून गेले, विजेचे खांब पडले, तारा तुटल्या, विजेचा खोळंबा, यासोबतच वादळी वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणात फळबागांचे नुकसान झाले असून पातूर तालुक्यातील विवरा येथील समाधान कवळे यांच्या शेतातील २ एकर लिंबूच्या मळ्यातील झाडे अक्षरशः जमिनीमधून मुळा सकट उखडली गेली.

त्यामुळे त्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या अचानक पणे झालेल्या नुकसानामूळे शेतीचे पुढील नियोजन कसे करावे या दृष्टचक्रात सध्या शेतकरी वर्ग सापडलाय. दरम्यान विवरा येथील विद्दुत खंबावर झाडांच्या फंदया कोसळल्याने विवरा परिसरात विद्दुत पुरवठा रात्र भर बंद होता सकाळी विद्दुत कर्मचारी गावत घाव घेऊन विद्दुत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न कर्मचारी कारित होते. एकूणच शासनाची मदतही नाही इकडून तिकडून नियोजन केले तर अस्मानी संकटही काही पिच्छा सोडत नाही असा विचिञ फेऱ्यात शेतकरी सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com