समाजमाध्यमाच्या संदेशाने मृतकाच्या कुटूंबियांना मदतीचा हात

Help of the family members of the deceased by the message of social media
Help of the family members of the deceased by the message of social media

गोंडपिपरी (चंद्रपूर)- घरातील कमावत्या एकुलत्या एक मुलाचा विद्यूत प्रवाहाने मृत्यू झाला आणि गरीब मात्यापित्यांचे आयुष्यच अंधारले. ग्रामपंचायतीने मदतीचे आश्वासन देत वेळ मारली. अशावेळी समाजमाध्यमाचा पॉझिटीव्ह संदेश कामी आला. गावाबाहेर असलेल्या भुमिपुत्रांना या वेदनाअसह्य झाल्या.

मग त्यांनी आपआपल्या परीने सतरा हजार रूपये जमा केले. काल रात्री गावातल्या मित्रमंडळीनी गरीब मायबापाला ही रक्कम दिली. यावेळी आशाळभूत मायबापाच्या डोळ्यातून आसवांची बरसात झाली.

समाजमाध्यमांचा पॉझिटीव्ह वापर समाजहिताठी कसा प्रभावी ठरू शकतो, याचा प्रत्यय गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात बघायला मिळाला. तरूण कमावता एकूलता एक आधार हरविल्याने दिपकच्या गरीब मातापित्याच आयुष्य अंधकारमय झाले. प्रशासन विरोधकांच्या चक्रात पिसलेल्या या कुटूंबियाच दु:ख कुणालाच दिसल नाही. अशात वैभव निमगडे या तरूणाने वृध्द मात्यापित्याला मदतीचा हात देण्याचे ठरविले. पण असे अनेक हात समोर आले तर चांगली मदत करता येईल या हेतूने त्याने "आम्ही करंजीकर"या गृपवर वृध्द मात्यापित्याच्या वेदना मांडल्या आणि मदतीसाठी हाक दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com