मित्राच्या उपचारासाठी गणेशमूर्ती विकून जमविली मदत!

Help funded by selling Ganesh idol for friends treatment
Help funded by selling Ganesh idol for friends treatment

अकोला - मालेगाव मुंबई येथे मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णावर उपचार होऊन प्राण वाचावेत यासाठी मालेगाव येथील अविनाश चव्हाण यांच्या मित्रांनी स्थानिक बाजारपेठेत स्वतःच्या पैशांनी गणेश मूर्ती आणल्या. या गणेश मूर्ती विक्रीतून मिळालेली रक्कम अविनाश चव्हाण यांच्या उपचारासाठी पाठविली जाणार आहे. त्यामुळे आज मालेगावकरांना मित्राचे प्राण वाचण्यासाठी मित्रांनी केलेली धडपड अनुभवास आली. 

मालेगाव शहरांमधील सेवानिवृत्त प्राचार्य गणपत चव्हाण यांचा मुलगा अविनाश गेल्या नऊ महिन्यांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले आहेत. त्यामुळे गावातील विद्यार्थी व मित्र मंडळी अविनाश गणपत चव्हाण यांच्यासाठी निधी उभारत आहेत. आठवड्यातून दोनदा त्यांना डायलेसीस करावे लागते. अविनाशच्या आजारपण दूर करण्यासाठी यकृत आणि किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे. सध्या त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासाठी त्यांच्या कुटुंबियांना सुमारे 30 लाख रुपयांचा उपचार खर्च येणार आहे. उपचार चालू ठेवण्यासाठी आणि त्याचे आयुष्य वाचविण्यासाठी निधी आवश्यक आहे. त्याकरिता निधी जमा करत आहेत.

अविनाश चव्हाण यांचे वडिल सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना मिळणार्‍या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम होते. मात्र, मुलाच्या उपचारासाठी लागणारी 30 लाखांची रक्कम जमविणे अशक्य आहे. त्यामुळे थोडी का होईना मात्र गणेश मूर्ती विकून जमणार्‍या पैशांतून मदत करण्याचा विडा अविनाश चव्हाण यांच्या मित्रांनी उचलला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com