अनाथांच्या आयुष्यात "सूर्यास्त'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

अकोला - अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात "सूर्यास्त' झाला आहे.

अकोला - अध्यात्माला समाजसेवेची जोड देत भय्यूजी महाराजांनी सूर्योदय आश्रम आणि सूर्योदय ग्रामच्या माध्यमातून वऱ्हाडात अनाथांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले होते. महाराजांच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात "सूर्यास्त' झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील कपिलेश्‍वर आणि बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्‍यातील महिमळ या गावात 1 जून 2008 रोजी सूर्योदय ग्राम योजना भय्यूजी महाराजांनी सुरू केली होती. याशिवाय अकोला शहरात मलकापूर परिसरात त्यांच्या संस्थेमार्फत 30 जानेवारी 2009 पासून सूर्योदय बालसुधार गृह चालविला जात होते. एड्‌सग्रस्त पालकांच्या मुलांचे पालकत्व या संस्थेने स्वीकारले होते. याशिवाय निमकर्दा येथेही आश्रमाची स्थापना करून ग्रामविकासाचा विडा उचलला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्‍यात त्यांनी 700 मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सूर्योदय संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले. या सर्व संस्थांची जबाबदारी महाराज स्वतः जातीने सांभाळत होते. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर काम केले. गरिबांना मदतीचा हात त्यांच्या संस्थेमार्फत नेहमीच दिला जातो. महाराजांच्या जाण्यानंतरही त्यांचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांच्या शिष्यांनी बोलून दाखविला.

Web Title: helpless people Bhayyuji Maharaj suicide