सव्वाशे वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघणार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नागपूर - गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विदर्भातील उन्हाच्या लाटेने शुक्रवारी रौद्ररूप धारण केले. संपूर्ण विदर्भातील सध्या उन्हाची लाट पसरली असून, नागपूरच्या कमाल तापमानामध्ये गेल्या तीन दिवसांत तब्बल सहा अंशांची वाढ झाली आहे. उन्हाचा कहर लक्षात घेता सव्वाशे वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

एप्रिल महिना जसजसा जवळ येत आहे, तसतसा पारा वाढत आहे. 21 मार्चला 35.2 अंशांवरील पारा तीन दिवसांत तब्बल सहा अंशांनी वाढला. 22 मार्चला 38.4 अंश सेल्सिअस, 23 मार्चला 40.6 अंश सेल्सिअस आणि आज शुक्रवारी 24 मार्चला उपराजधानीतील कमाल तापमान 41.5 अंशांवर गेले. तापमानवाढीचा आलेख लक्षात घेता मार्च महिन्यातील सव्वाशे वर्षांपूर्वी नोंदविण्यात आलेला सार्वकालिक विक्रम मोडीत निघण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 45 अंश सेल्सिअसचा तो विक्रम 28 मार्च 1892 रोजी नोंदला गेला होता. मार्च संपायला जवळपास एक आठवडा असून, उन्हाची लाट अशीच कायम राहिल्यास नागपूरकरांना नवा विक्रम अनुभवायला मिळू शकतो. 

विदर्भातील इतरही शहरांमध्ये उन्हाचा तडाखा दिसून आला. काल अकोलेकरांनी मध्य भारतातील सर्वाधिक तापमानाचा अनुभव घेतल्यानंतर आज वर्धा येथे पाऱ्याने 41.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर येथेही पाऱ्याने चाळिशी पार केली. उन्हामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील गर्दीही रोडावली आहे. उशिरा रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा बसत असल्याचे चित्र सध्या नागपूर व विदर्भात दिसते आहे. 

Web Title: High temperature in nagpur