महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान खामगावात : ४७.६ अशं सेल्सीअस

सिद्धांत उंबरकार 
मंगळवार, 29 मे 2018

खामगाव  :  विदर्भात तापमानाचा पारा वाढतच असून सोमवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक ४७.६ अंश तापमानाची नोंद खामगाव येथे झाली. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढलेली दिसत आहे. नवतप सुरु असून खामगाव शहरात उन्हाचा पारा ४७.६ अशं सेल्सीअसवर जाऊन ठेपला आहे. यामुळे जिवाची काहीली होत आहे.  गेल्या १५  दिवसांपासून लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. 

खामगाव  :  विदर्भात तापमानाचा पारा वाढतच असून सोमवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक ४७.६ अंश तापमानाची नोंद खामगाव येथे झाली. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढलेली दिसत आहे. नवतप सुरु असून खामगाव शहरात उन्हाचा पारा ४७.६ अशं सेल्सीअसवर जाऊन ठेपला आहे. यामुळे जिवाची काहीली होत आहे.  गेल्या १५  दिवसांपासून लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. 

सन २०११ - १२ मध्ये पारा हा ४८ सेल्सीअसच्या जवळपास पोहोचला होता. त्यानंतर चार ते पाच वर्षात पारा ४५ ते ४६ सेल्सीअस दरम्यान असायचा परंतु यावर्षी सुर्याने प्रकोप दाखवून खामगाव शहरातील तापमान ४७.६ सेल्सीअस अंशावर पोहचविले.  सोमवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद खामगावात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होते. दुपारी ११ वाजेनंतर तर घराबाहेर पडणेही कठीण होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख मार्गावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शहरासह परिसरात उन्हाचा चटका कायम आहे.
तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरीक अक्षरश: हैराण झाले आहेत. नेहमी वर्दळ असणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह बाजारपेठेतही दुपारी बारानंतर शुकशुकाट पहावयास मिळतो. उन्हाची ही तीव्रता ५  नंतर कमी होते. मात्र सायंकाळी ९ वाजेपर्यंतही उन्हाच्या वाफा लागतात.  या वाढत्या तापमानामुळे संपूर्ण जनजीवन प्रभावित झाले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला होता. सध्या मध्य भारतात कोरडे वारे वाहत असल्यामुळे उष्मा वाढला आहे.  मे महिन्यात पारा वाढतच असून अनेक आजार होण्याची शक्यता आहे. उष्मघातकाची  लक्षणे दिसत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाची तीव्रता पाहता नागरिकांनी आरोग्य जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अकोला, चंद्रपूर शहरातील तापमानाची नोंद महाष्ट्रातील सर्वाधिक तापमान म्हणून केली जाते.  तसे पाहता खामगाव शहरातील तापमान एप्रिल मध्येच ४६ अंशाच्या वर गेलेले असते. आता तर सर्वाधिक तापमान ४७.६ खामगावात नोंदविले गेले आहे. मात्र हवामान विभाग जिल्ह्यानुसार तापमानाची नोंद घेत असल्याने या यादीत खामगाव चा समावेश केला जात नाही. 

  • वातावरण बदलाचा परिणाम

दिवेसेंदिवस तापमाणात वाढ होत असुन वातावरण बदलाचा परिणाम माणवी शरिरावर दिसून येतो.  तापमाणात कमी अधिक प्रमाणात बदल होत असल्याने अनेक आजारांची लागन होत आहे. त्यामुळ सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या संख्येने वाढ झाली आहे. व्हायरल फ्युब, सरदी, खोकला, अशक्तपना येणे, उष्मघात, दुषित पाणी प्यायल्याने डायरीया सारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवडा भरापासून सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येते. वातावरणात होत असलेल्या बदलाच्या परिणामुळे लहान मुले, वयोवृध्द यांची प्रकृती खालावत आहे. उन्हापासून काळजी घेण्याची गरज आहे. 

Web Title: The highest temperature in Maharashtra is in Khamgaon: 47.6 degrees Celsius