हिंदूंचा पैसा मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर का? - प्रवीण तोगडिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नागपूर - हिंदूंच्या कराचा पैसा मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यास विरोध दर्शवतानाच बेरोजगारी, कुपोषण, महागड्या आरोग्य व शिक्षणावर केंद्र सरकार नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरल्याचे सांगून, विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.

नागपूर - हिंदूंच्या कराचा पैसा मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यास विरोध दर्शवतानाच बेरोजगारी, कुपोषण, महागड्या आरोग्य व शिक्षणावर केंद्र सरकार नियंत्रण मिळविण्यास अपयशी ठरल्याचे सांगून, विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.

'देशात 95 लाख मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलत आहे. हा पैसा हिंदूंचा आहे. अनेक हिंदू मुले आजही अशिक्षित आहेत. त्यांच्या शिक्षणाची सोय नाही. सरकारने दहा कोटींचा खर्च हिंदूंच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा. हिंदूंच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी,'' अशी मागणीही तोगडिया यांनी केली. येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

'राममंदिराच्या निर्माणासाठी न्यायालयाच्या आदेशाचे कारण सांगण्यात येते. न्यायालयाने रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत लाऊड स्पीकर बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतरही मशिदीवरून स्पीकर काढले जात नाहीत,'' याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'शेतकरी कर्जबाजारी असून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शिक्षितांचे प्रमाण कमी होत आहे. आरोग्याच्या सोयी महाग झाल्या आहेत. सरकारचे याकडे लक्ष नाही. विश्‍व हिंदू परिषद स्वतः लोकांना अन्न व शिक्षण देत आहे. लोकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्रत्येक डॉक्‍टरला एका रुग्णाला मोफत तपासण्याचे आवाहन केले आहे,'' असे त्यांनी सांगितले.

विदर्भ

अकोला : गतवर्षी सामाजिक वनिकरण विभाग अकोल्याला विदर्भातील ‘पहिली’ ‘प्लांट टिशू कल्चर लॅब’ मंजूर झाली होती. त्यामुळे जिल्ह्यात...

10.12 AM

नागपूर - शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असून, यासाठी ऑनलाइन अर्जाची अट घातली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया...

09.09 AM

नागपूर - शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र द्यावे लागते. मात्र, आता शेती लाभाच्या योजनेसाठीही...

09.09 AM