होमगार्डवर सरकारची दडपशाही

Homeguard
Homeguard

नागपूर - गणेशोत्सव बंदोबस्तावर होमगार्ड जवानांनी बहिष्कार टाकल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गृह विभाग जागा झाले आहे. नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, अन्यथा बंदोबस्तावर बहिष्कार टाकल्याने होमगार्डवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे निर्देश राज्यातील सर्वच होमगार्ड जिल्हा समादेशकांनी दिले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारकडून होमगार्डवर दडपशाही केली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

मुंबई मुख्यालयाने राज्यातील महिला आणि पुरुषांसह १० हजार ११० होमगार्डना गणेशोत्सव बंदोबस्तासाठी तैनात राहण्याचे आदेश दिलेले आहेत. १२ सप्टेंबरपासून बंदोबस्तात नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्यावर रुजू होण्याबाबत कळविलेले आहे. परंतु, अद्याप वृत्तपत्र आणि ‘व्हॉट्‌सॲप’च्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्‍वास ठेवून आपण कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. गणेशोत्सव बंदोबस्त अत्यंत महत्त्वाच्या बंदोबस्तामध्ये मोडतो. आपल्या शहर आणि गावात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या कामात पोलिस विभागासोबतच होमगार्डचीसुद्धा महत्त्वाची भूमिका असते.

यामुळे तत्काळ नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून होमगार्ड जवानांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसच्या माध्यमातून दबाव टाकण्यात येत आहे. याबाबत वृत्तमालिका ‘सकाळ’ प्रकाशित करीत आहे, हे विशेष.   होमगार्ड गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना होमगार्डच्या मागण्यांना समर्थन केले होते. 

सत्तेवर येताच होमगार्डला कायम नोकरीत सामावून घेऊ असे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री म्हणून चार वर्षांचा कार्यकाळ लोटला असताना अद्याप होमगार्डची एकही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आता सरकारच्या दबावाला बळी न पडता बंदोबस्तावरील बहिष्कार मागे न घेण्याचा दृढ संकल्प होमगार्ड जवानांनी केलेला आहे.

जिल्हा समादेशकाची तंबी 
नागपूर जिल्ह्यातील होमगार्डनी बंदोबस्तावर बहिष्कार टाकल्याने ते कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. तशी सूचना आपण जिल्हा प्रशासनाला दिलेली नाही, ही गंभीर बाब आहे. तातडीने होमगार्डला कर्तव्यावर रुजू होण्यासाठी प्रेरित करावे अशी तंबी जिल्ह्यातील सर्व समादेशक व प्रभारी अधिकारी यांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com