आजपासून बारावीची तर सात मार्चपासून दहावी परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्या मंगळवारपासून (ता. 28) प्रारंभ होत आहे. यास्तव कॉपी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून दोन्ही मिळून विभागातून 3 लाख 45 हजार 951 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत. 

अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला उद्या मंगळवारपासून (ता. 28) प्रारंभ होत आहे. यास्तव कॉपी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. सात मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून दोन्ही मिळून विभागातून 3 लाख 45 हजार 951 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत. 

फेब्रुवारी 2017 मध्ये होऊ घातलेल्या या परीक्षांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येकी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली. आवश्‍यकता भासल्यास आणखी पथके तयार करण्यावर भर देण्यात येईल, असे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी सांगितले. 

दहावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागात एकूण 1 लाख 58 हजार 349 विद्यार्थी असून 454 परीक्षा केंद्र राहतील; तर बारावीकरिता 1 लाख 87 हजार 602 विद्यार्थी प्रविष्ट असून 686 परीक्षा केंद्र राहतील. दहावीसाठी 68 हजार 90 मुली; तर 81 हजार 862 मुले प्रविष्ट झालेले आहेत. हीच संख्या बारावीसाठी मुली 79 हजार 816 व मुले 96 हजार 109 एवढी राहणार आहे. यांसह दहावीचे 8 हजार 397; तर बारावीचे 11 हजार 677 पुनःपरीक्षार्थीही आहेत. 

...तर केंद्राध्यक्षांना जबाबदार धरू! 
एखाद्या केंद्रावर कॉपीसारखा प्रकार भरारी पथकास आढळून आल्यास संबंधित केंद्राधिकाऱ्यांना त्यासाठी दोषी धरण्यात येईल. जिल्हास्तरावर प्रत्येकी सात भरारी पथके तयार करण्यात आलीत; आवश्‍यकता भासल्यास आणखी पथके नियुक्त केली जाऊ शकतात, असे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी सांगितले. 

जिल्हानिहाय परीक्षार्थी 
जिल्हा दहावी बारावी 
अकोला 28,607 31,579 
अमरावती 20,440 47,254 
बुलडाणा 33,324 42,838 
यवतमाळ 35,502 43,863 
वाशीम 18,863 22,068 

परीक्षाकेंद्र 
जिल्हा दहावी ः बारावी 
अकोला 76 ः 116 
अमरावती 125 ः 192 
बुलडाणा 98 ः 149 
यवतमाळ 104 ः 150 
वाशीम 56 ः 79 

विदर्भ

नागपूर - माथाडी कामगारांचे वेतन चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार दोन आठवड्यांमध्ये नव्याने निश्‍चित करा, असा आदेश बुधवारी...

02.00 PM

नागपूर - अकरावी-बारावीचे वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये होत नसले तरी त्याच वर्गातील मुलांच्या भरवशावर खासगी क्‍लासेसची...

01.57 PM

नागपूर - ऑक्‍सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे गोरखपूर येथील रुग्णालयात ७० चिमुकले दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्‍वभूमीवर...

09.21 AM