मानवी रांगोळीने घडविला जागतिक विक्रम

मानवी रांगोळीने घडविला जागतिक विक्रम

बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13) 
सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. मैदानात हिरव्या, पांढर्‍या, काळ्या व केशरी रंगातील टी शर्ट परिधान केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मैदानातील या मानवी रांगोळी पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मैदानातील उत्साहपूर्ण वातावरणात 5 हजार विद्यार्थ्यांनी ५ मिनीटे मौन धारण करत नतमस्तक होत निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची मानवी रांगोळी साकारली. बुलडाणा शहराला लागलेल्या जागतिक किर्तीमान नोंदविण्याची ओढ आज प्रत्यक्षरित्या मैदानातही दिसून आली.

मानवी रांगोळी साकारत विद्यार्थ्यांनी एकच आवाजात भारत माता कि जय… म्हटले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसले सोबतच देशात सर्वात मोठ्या मानवी रांगोळीचा भाग झाल्याचा अभिमानही दिसून आला. या कार्यक्रमाने एक नवा इतिहास रचला असून, याची नोंद इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

सोहळ्यासाठी निवडणूक आयोगाचे उप-मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे मनोहर तत्ववादी आदी उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमाप्रसंगी आमदार चैनसुख संचेती, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो. सज्जाद, बुलडाणा अर्बन क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मतदार जागृती मोहिम, विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम व या उपक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, महिला बचत गट, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पतसंस्था चालक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाप्रमाणे साकारली.

या रांगोळीचर दखल इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने घेतली. त्यांनी संपर्ण रांगोळीचे व्हिडीओ चित्रीकरण केले. ही मानवी रांगोळी ५ मिनीटे ठेवून त्यांनी या उपक्रमाची नोंद केली. त्यानंतर निवडणूक आयागोला या उपक्रमाची नोंद घेतले असल्याबद्दलचे प्रमाणपत्र, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.  या उपक्रमाच्या निमित्ताने जिजामाता प्रेक्षागार येथील बाहेरील भागात जिल्हा माहिती कार्यालयाचा लोकराज्य, वन विभाग आदींचे स्टॉलही लावण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचलन अंजली परांजपे व सदानंद काणे यांनी केले. आभार उपविभागीय अधिकारी श्रीमती गोणेवार यांनी मानले.  कार्यक्रमासाठी तहसीलदार सुरेश बगळे व त्यांच्या सहकार्‍यांनी कार्य केले.

*जिल्हाधिकाऱ्यांना मानवंदना

कार्यक्रमाच्या सुरवातीला एनसीसी कॅडेट्सनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना मानवंदना दिली. तसेच सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेतील निवडणूक व मतदार जागृती या विषयावरील उत्कृष्ट चित्रांचे अवलोकन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com