पतीनेच केला पत्नीच्या अब्रूचा सौदा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जुलै 2016

यवतमाळ - सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी एका नराधम पतीने आपल्या पत्नीच्या अब्रूचा सौदा केल्याचा प्रकार जिल्ह्यातील घाटंजी येथे उघडकीस आला. एका शेतकऱ्याच्या पुढाकाराने ही घटना पोलिसांपर्यंत पोचली. सावकाराच्या कर्जाचे डोंगर वाढत असल्याने परतावा म्हणून चक्क पत्नीचा वापर करणाऱ्या या पतीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 14 जणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला मूळची नांदेड जिल्ह्यातील असून, तिचे घाटंजीतील एका मजुराशी लग्न झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

टॅग्स