पुलाखाली आढळला भूसुरुंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

माओवाद्यांचा घातपाताचा डाव फसला
अहेरी (जि. गडचिरोली) - पोलिस पथकासोबत घातपात घडून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी पुलाखाली पुरवून ठेवलेली तीन किलो आयईडी स्फोटके सापडली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मोसम गावालगत आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे व सीआरपीएफच्या 9 बटालियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली, की जिमेला व मोसम गावालगत मुख्य मार्गावरील एका पुलाखाली माओवाद्यांनी भूसुरुंग पेरलेला आहे. त्याआधारे पोलिस घटनास्थळी पोचले. स्फोटकांचा शोध घेतला असता पुलाखाली 3 किलोचा भूसुरुंग आढळून आला. त्यानुसार पोलिस व सीआरपीएफ पथकाने त्याला बाहेर काढून घटनास्थळावरच निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. माओवाद्यांविरोधात राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात अभियान तीव्र केले आहे.

Web Title: ied explosive receive