मिहानमध्ये उभारणार इंदमार एमआरओ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

नागपूर - एअर इंडियाच्या एमआरओनंतर आता मुंबईत मुख्यालय असलेली भारतातील तिसऱ्या क्रमांकाची एमआरओ कंपनी इंदमार एव्हिएशन सर्व्हिस कंपनी मिहानमध्ये दुरुस्ती व देखभाल केंद्र (एमआरओ) उभारणार आहे. एअर इंडिया एमआरओच्या शेजारील 30 एकर जागा खरेदी केली. एमएडीसीकडे पूर्ण रक्कम भरली असून, लवकरच एमएडीसी आणि इंदमार एव्हिएशनमध्ये करार होणार आहे. 

मिहान प्रकल्पात बोइंग कंपनीने एमआरओ उभारले असून, त्यात बोइंग कंपनीच्या विमानांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. काही दिवसांपूर्वी काही खासगी कंपन्यांसोबतही करार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना आता इंदमार एव्हिएशन सर्व्हिस कंपनीने एमआरओ सुरू करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. एमआरओसाठी अंदाजे 100 कोटींच्या गुंतवणुकीची शक्‍यता आहे. त्यात एक हजार लोकांना रोजगार मिळेल. एमआरओमध्ये लहान विमानांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येईल. भविष्यात नागपूर विमान दुरुस्तीचे हब होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

मिहानमध्ये टाटा एरोनॉटिक लिमिटेड (ताल) बोइंगच्या विमानाला लागणारे फ्लोअर बीमसह इतरही पार्टचे उत्पादन केले जाते. याशिवाय अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनीचा विमानाशी संलग्नित प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारही झाला. मात्र, अद्याप जागा किती हवी याबद्दल एमएडीसीकडे कंपनीने मागणी केलेली नाही. प्रारंभी अडीचशे एकर जागेची मागणी केली होती. त्यानंतर ती कमी करून 104 एकर जागा हवी असल्याचे पत्र दिले. आता त्यापेक्षाही कमी जागा हवी असल्याबद्दल वाटाघाटी सुरू असल्याने या प्रकल्पाबद्दल अनिश्‍चितता आहे. तरी तीन प्रकल्पांमुळे मिहानला झळाळी मिळण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Indamara set up MRO in Mihan