सीमेवर असतानाही मिळविली पीएच.डी. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर -
 ‘नारी नहीं है सपना, 
नारी नहीं कहानी।
नारी की गोद में पलती जिंदगानी
यह घर-घर की लक्ष्मी, 
सिंदूर बन के दमके
मौका पड़े तो चूडियां तलवार बनके खनके।’

नायब सुभेदार इंद्रकुमार शर्मा यांनी केलेली ही कविता. कर्तव्यावर असतानाही मनात शिक्षणाची ओढ असलेल्या इंद्रकुमार शर्मा यांनी ‘आधुनिक कृष्ण काव्य में नारी चेतना का अनुशीलन’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. १०३ व्या दीक्षान्त समारंभात त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले.

नागपूर -
 ‘नारी नहीं है सपना, 
नारी नहीं कहानी।
नारी की गोद में पलती जिंदगानी
यह घर-घर की लक्ष्मी, 
सिंदूर बन के दमके
मौका पड़े तो चूडियां तलवार बनके खनके।’

नायब सुभेदार इंद्रकुमार शर्मा यांनी केलेली ही कविता. कर्तव्यावर असतानाही मनात शिक्षणाची ओढ असलेल्या इंद्रकुमार शर्मा यांनी ‘आधुनिक कृष्ण काव्य में नारी चेतना का अनुशीलन’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. १०३ व्या दीक्षान्त समारंभात त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले.

बिहारमधील इंद्रकुमार शर्मा यांचा परिवार गेल्या २५ वर्षांपासून नागपुरात वास्तव्यास आहे. बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर १९९७ साली त्यांनी सैन्यात प्रवेश केला. मात्र, यादरम्यान विविध ठिकाणी त्यांची पोस्टिंग असतानाही मनात शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. यातूनच पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर २०१० साली त्यांनी विद्यापीठातून पीएच.डी.साठी नोंदणी केली. यादरम्यान, त्यांची पोस्टिंग श्रीनगर येथील दहशतवादी कारवाया होणाऱ्या परिसरात होती. त्यातून मिळणारा दहा ते वीस मिनिटांच्या वेळात ते आपले संशोधन कार्य करण्यात व्यस्त असायचे. शिवाय काम संपल्यावर रात्रभर संशोधन कार्यात व्यस्त असायचे. त्यांच्या या कार्यातून सेनेतील वरिष्ठ अधिकारीही त्यांना प्रोत्साहन देत असत. अनेकांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली. त्यांनी पीएच.डी.साठी डॉ. प्रभातकुमार दुबे यांचे फोनवरून  मार्गदर्शन घ्यायचे. त्या आधारावर २०१४ साली त्यांनी शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला. सध्या ते अंदमान-निकोबार महाद्वीप येथे नायब सुभेदार पदावर कार्यरत आहेत. पदवी प्रदान समारंभाला पत्नी संगीता शर्मा, मुलगी राजश्री यांचीही यावेळी उपस्थिती होती.