जबलपूर ब्रॉडगेजवर धावणार पॅसेंजर

जबलपूर ब्रॉडगेजवर धावणार पॅसेंजर

गोंदिया - नव्याने विकसित केलेल्या मध्य प्रदेशातील जबलपूर ब्रॉडगेज मार्गावर पॅसेंजर गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गोंदिया-जबलपूर ब्रॉडगेजअंतर्गत जबलपूर ते सुकरीमंगेलादरम्यान १५ ऑगस्टपासून गोंदिया-जबलपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे प्रशासनाने चाचण्या सुरू केल्या आहेत. 

ब्रॉडगेजच्या ट्रॅकवरून पहिल्यांदा इंजिनचे ट्रायल घेण्यासाठी नागपूर मंडळाचे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल आपल्या चमूसह पोहोचले होते. कछपुरावरून रवाना झाल्यावर १० मिनिटांनंतर इंजिन गढा स्थानकावर पोहोचले. तेथे निरीक्षणादरम्यान प्लॅटफार्मसह शेडचे अपूर्ण बांधकाम व चिखलयुक्त स्थिती पाहून ते स्थानिक व्यवस्थापनावर नाराज झाले. त्यांनी सर्व अपूर्ण कामांचे छायाचित्र घेतले. त्यानंतर त्यांनी ग्वारीघाट, जमतरा, चारघाट पिपरिया व बरगी येथेसुद्धा इंजिन थांबवून निरीक्षण केले.  ट्रायल इंजिन कछपुरा ते ग्वारीघाटपर्यंत ५५ किमी प्रतितास, ग्वारीघाट ते बरगीपर्यंत ५० व बरगी ते सुकरीपर्यंत २० किमी प्रतितासाच्या गतीने चालविण्यात आले. ग्वारीघाट येथील अपूर्ण काम १५ ऑगस्टपूर्वी कोणत्याही स्थितीत पूर्ण करण्याचे तेथील व्यवस्थापनाला निर्देश दिले. 

साडेतीन लाखांचा दंड वसूल 

गोंदिया ः रेल्वेत विनातिकीट प्रवास करणारे व विनामाल बुक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून तीन लाख ५१ हजार ८३० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई १ ते ६ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल यांच्या नेतृत्वात विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात विनातिकीट प्रवास करणारे व विनामाल बुक केलेल्या लगेजचे एक हजार ६४० प्रकरणे  उघडकीस आणण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख ५१ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय केरकचरा पसरविण्याच्या नऊ प्रकरणांत संबंधितांकडून जवळपास ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. या अभियानाअंतर्गत रेल्वे मजिस्ट्रेटतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्प कोर्टात १४२ जणांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत कारवाई करून ६१ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com