जलयुक्त शिवाराची आमीर खानकडून प्रशंसा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली जलयुक्त शिवार योजना उत्तम असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी मंगळवारी व्यक्त करून या योजनेची प्रशंसा केली.

नागपूर - "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली जलयुक्त शिवार योजना उत्तम असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी मंगळवारी व्यक्त करून या योजनेची प्रशंसा केली.

पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित "वॉटर कप' स्पर्धेची माहिती देण्यासाठी आमीर खान गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात आहेत. नागपुरात आज पत्रकार परिषदेत बोलताना आमीर खान यांनी "पाणी' याशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोलणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात जलयुक्त शिवार ही जलसंधारणाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून अनेक गावांमधील पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले आहे. या योजनेची प्रशंसा आमीर खान यांनी या वेळी केली. जलसंधारणाच्या कामात सर्वांनी सहभाग देण्याची आवश्‍यकता असल्यावर त्यांनी भर दिला.

"वॉटर कप' स्पर्धेअंतर्गत जलसंधारणामध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या गावांना एकूण 10 कोटी रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 75 लाख रुपयांचे आहे.

Web Title: jalyukta shivar aamir khan praise