‘दापोली’त कृषी विद्यापीठांचे ‘जाॅईन्ट अॅग्रोस्को’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

आजपासून जॉईन्ट अॅग्रोस्कोला सुरवात होत आहे. तीन दिवस हा अॅग्रोस्को चालणार असून, त्यामध्ये कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मान्यतेने विद्यापीठाच्या संशोधित ४३ शिफारसी सादर केल्या जाणार आहेत. मंजूरी मिळालेल्या शिफारसी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.
- डॉ.व्ही.के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला

अकोला ः दरवर्षीप्रमाणे राज्यातील चारही कृषी विद्यापाठाचे जॉईन्ट अॅग्रोस्को यंदा दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. आजपासून या अॅग्रोस्कोला सुरवात होत असून, त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापाठाद्वारे सहा नवीन यंत्रांसह विविध पिकवाणांच्या ४३ शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.

शेती व शेतीपुरक उद्योगामध्ये विकास साधण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठ संशोधन विभागाद्वारे विकसित तंत्रज्ञानातून विविध शिफारसी करण्यात येतात. नवशिफारसीत तंत्रज्ञानाची उत्पादनक्षमता व गुणवत्ता अधिक असते. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनातून आर्थिक विकास साधता येतो. या संशोधनातून कमी खर्चात अधिक उपयुक्त उपकरणे, यंत्रे व मृद विकास साधला जोतो. कमी खर्चात, कमी पाण्याची शेती व त्यातून गुणवत्तापुर्ण व जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या अशा नवसंशोधीत ४३ वाणांच्या शिफारसी यंदा डॉ.पंदेकृवि अकोला सादर करत असून, अॅग्रोस्कोमधील मंजूरीनंतर या शिफारसी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.

विद्यापीठाच्या या महत्त्वाच्या शिफारसी
यंदा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून सादर केल्या जाणाऱ्या ४३ शिफारसीमध्ये सोयाबीनेच एएमएस १००१ (पीडीकेव्ही एलो गोल्ड), धानामध्ये बारीक दाण्यचा पीडीकेव्ही तिलक, साकोली १० जास्त उत्पादन देणारे व रोग कीडीला प्रतिकारक वाण, हरभऱ्याचे एक वाण, ग्लाडिओलस फुलाचे जास्त दांड्या असणारे वाण. गुलाबी बोंडअळीवर उपाय म्हणून सौरउर्जेवर चालणारा प्रकाश सापळा. यंत्रांमध्ये छोट्या ट्रॅक्टरवर चालणारे पेरणी व डवरणी यंत्र, जांभुळ गर निष्काशक यंत्र, स्लॅशर (गवत काढण्यासाठी), नर्सरीमधिल पिशव्यांमध्ये माती भरण यंत्र आदी महत्त्वाच्या शिफारसींचा समावेश आहे.

आजपासून जॉईन्ट अॅग्रोस्कोला सुरवात होत आहे. तीन दिवस हा अॅग्रोस्को चालणार असून, त्यामध्ये कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मान्यतेने विद्यापीठाच्या संशोधित ४३ शिफारसी सादर केल्या जाणार आहेत. मंजूरी मिळालेल्या शिफारसी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.
- डॉ.व्ही.के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला

Web Title: joint agrosco in Dapoli