गर्भवतीची न्यायासाठी आर्त हाक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

मनसर : येथील मुलीचे महात्मा फुले वॉर्ड रामटेक येथील युवक जितेंद्र गोविंद वैद्यसोबत प्रेम होते. मुलाने घरच्यांची परवानगी न घेता मार्च 2016 मध्ये प्रेमविवाह केला आणि रामटेकमध्ये भाड्याने राहू लागला. यानंतर जितेंद्रच्या घरच्यांनी एप्रिल 2016 मध्ये त्यांचे लग्न करून दिले. त्यानंतर पीडित सासरी राहू लागली. अशातच पीडितेला माहेरी सोडले. तेव्हापासून ती तिथेच असून, न्यायासाठी लढत आहे. 

लग्नानंतर पीडितेला दिवस गेल्यानंतर दोन महिन्यांतच गर्भपात झाला. कालांतराने ती बरी झाली. काही दिवसांनी तिला पुन्हा दिवस गेले. तीन महिन्यांची गर्भवती असल्यानंतर पती जितेंद्र, सासरे गोविंद, सासू सुनंदा व भासऱ्यांनी तिला 9 सप्टेंबरला माहेरी सोडले. मात्र, आजवर तिला कुणीही भेटायला आले नाही आणि फोनसुद्धा केला नाही. ती सध्या 9 महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेच्या माहेरची आर्थिक स्थिती चांगली नसून, तिची शारीरिक स्थिती कमकुवत आहे. 

न्यायासाठी तिने 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत पोलिस स्टेशन व महिला तक्रार निवारण केंद्र रामटेक येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली; मात्र त्यांना अटक केली नाही. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍न निर्माण होत आहे. पीडितेच्या मोहल्ल्यातील महिलांनी तिचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम केला. परंतु, तिचे बाळंतपण कोण करणार, असा प्रश्‍न तिच्या आजारी आईला भेडसावत आहे. पीडितेला वडील नाहीत. तेसुद्धा तिच्या आईला अशाच प्रकारे माहेरी सोडून गेले होते व कधीच परतले नाहीत. दुसरीकडे सासरचे जितेंद्रच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करीत आहेत. पीडितेला तिचा पती जितेंद्रसोबत नांदायचे आहे. त्याने तिच्या बाळंतपणाचा सर्व खर्च उचलावा, येणाऱ्या बाळाला स्वीकारावे व सोबत घेऊन जावे, अशी तिची इच्छा आहे. 

अचानक हीन वागणूक 
लग्नानंतर सर्व काही ठीक असताना पीडितेला सासरच्या मंडळीकडून अचानक जातीचे चटके अनुभवू लागले. सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. तुझ्या घरच्यांनी लग्नात काही दिले नाही, तू खालच्या जातीची, असे म्हणून हीन वागणूक दिली. 

Web Title: justice for pregnant women

टॅग्स