कामठीच्या निकालाने सर्वच बुचकाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नागपूर - कामठी नगरपालिकेच्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथील राजकारण कोळून प्यालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे हेसुद्धा यामुळे बुचकाळ्यात पडले आहेत. कामठीने विकासकामांपेक्षा जाती, धर्माला मतदान करून आपला स्वभाव कायम राखल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदारसंघात कामठी नगरपालिका येत असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. पालकमंत्र्यांनी सुमारे दोन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात निधीचा मोठा ओघ कामठीकडे विळविला. कोट्यवधींच्या घोषणा केल्या. विकासकामे केली. 

जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन मतदार विकासाला प्राधान्य देतील अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, कामठीची संपूर्ण निवडणूक धर्म आणि जातीच्या सभोवताल फिरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा दोन गटांत येथील मतदार विभागला गेला. मुस्लिमांनी कॉंग्रेस आणि एमआयएमला कौल दिला तर दुसरीकडे हिंदूच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले. माजी नगराध्यक्ष रणजित सफेलकर यांनी हिंदूंच्या मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन केले. याचाही फटका भाजप व बरिएंमला बसला. 

भाजपने ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत युती केली होती. ही करताना दोन्ही पक्षाने आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह कायम ठेवले होते. जिल्ह्यातील सर्वांत मोठी ही नगरपालिका होती. तब्बल 31 उमेदवारांना निवडून द्यायचे होते. यापैकी कॉंग्रेसने सर्वाधिक 16 जागा जिंकल्या तर भाजपला फक्त आठच जागा जिंकता आल्या. बरिएमंने दोन, शिवसेना एक, एमआयएम एक व अपक्ष दोन सदस्य निवडून आलेत. 

Web Title: Kamthi result