'ग्रीन डे' राज्यभर साजरा करण्यासाठी प्रयत्न करणार; कृषिमंत्र्यांकडून 'सकाळ'च्या उपक्रमाचे कौतुक!

श्रीधर ढगे
गुरुवार, 6 जुलै 2017

सकाळ' माध्यम समूहातर्फे वसुंधरेच्या संवर्धनासाठी बुधवारी (ता. 5) 'ग्रीन डे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाच जुलै हा संपूर्ण राज्यभर 'ग्रीन डे' म्हणनू साजरा करण्याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

खामगाव (जि. बुलडाणा) - 'सकाळ' माध्यम समूहातर्फे वसुंधरेच्या संवर्धनासाठी बुधवारी (ता. 5) 'ग्रीन डे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाच जुलै हा संपूर्ण राज्यभर 'ग्रीन डे' म्हणनू साजरा करण्याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

'एकच लक्ष चार कोटी वृक्ष' या उपक्रमाअंतर्गत आज (गुरुवार) खामगाव नगर येथे कॄषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, आमदार ऍड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तत्पुर्वी सकाळच्या 'ग्रीन डे' बाबत फुंडकर यांनी माहिती जाणून घेतली. 'वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज असून त्यासाठी सकाळ ने 'ग्रीन डे' च्या माध्यमातून मोठी लोकचळवळ उभारली आहे', अशा प्रतिक्रिया फुंडकर यांनी व्यक्त केल्या. आगामी काळात 5 जुलै हा दिवस शासनातर्फे 'ग्रीन डे' घोषित व्हावा या करीता आपण प्रयत्न करणार असून त्यासंदर्भात मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

■ असा झाला 'ग्रीन डे'
'सकाळ' माध्यम समूहातर्फे वसुंधरेच्या संवर्धनासाठी बुधवारी (ता. 5) 'ग्रीन डे' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जीवसृष्टी वाचवायची असेल, तर प्रत्येकाला पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल. नुसते रक्षण नव्हे, तर स्वत: रोपटी लावावी लागतील, हाच संदेश नागरिकांमध्ये पोचविण्यासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती करून वृक्षारोपणाचे आवाहन या उपक्रमाद्वारे करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विदर्भातील शेकडो शाळांच्या परिसरात हजारांवर विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले.

■ उपक्रमास प्रतिसाद
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये वृक्षारोपण
गडचिरोली : विविध शाळांमध्ये 'सकाळ'तर्फे ग्रीन डे.
भंडारा : जिल्ह्यात 'ग्रीन डे' मोठ्या उत्साहात साजरा
गोंदिया : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना शपथ.

■ दृष्टिक्षेपात 'सकाळ ग्रीन डे'
व्याप्ती : विदर्भातील 11 जिल्हे
सहभाग : 200 शाळा
विद्यार्थी : 1 लाख
वृक्षारोपण : 20 हजार रोपे

विदर्भ

वर्धा : आष्टी तालुक्यातील वडाळा येथील शेतकरी शेतातून बैल घरी परत आणत असताना एका वाघिणीने हल्ला चढवला. या हल्ल्यात बैल पळून...

03.42 PM

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर जारावंडी मुख्य रस्त्यावरून वाहणारे झुरी नाला व कांदळी नाल्यावरील पुलाचे नुकसान...

02.09 PM

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017