युवतीचा युवकावर चाकूने हल्ला

File photo
File photo

नागभीड (जि. चंद्रपूर) : येथील विश्रामगृहासमोर एका विवाहित पुरुषावर युवतीने चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता. 17) रात्री 8.30 वाजताच्या सुमाराला घडली. हल्ल्यामागील नेमके कारण पोलिसांना कळू शकले नाही.
हल्लेखोर युवतीचे नाव ममता बनकर (वय 22) आहे. ती ब्रह्मपुरी तालुक्‍यातील खरबी येथील रहिवासी आहे. जखमी किशोर जगदीश पाथोडे (वय 30) हा नागभीड तालुक्‍यातील चिंचोली खुर्द येथे राहतो. तो विवाहित आहे. ममता येथील तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात संगणक चालक होती, तर किशोर संगणक दुरुस्तीचे काम करायचा. यातून दोघांची ओळख झाली. सोमवारी दोघेही विश्रामगृहाजवळ आले. त्यांच्यात कडाक्‍याचे भांडण झाले. सुरुवातीला किशोरने ममतावर चाकूने हल्ला केला. त्यात ती किरकोळ जखमी झाली. मात्र, प्रसंगावधान राखून तिने त्याच्या हातून चाकू हिसकला. त्याच चाकूने त्याच्या मानेवर आणि इतर भागांवर वार केले. रक्तबंबाळ किशोर आणि हातात चाकू घेतलेली ममता असे दृश्‍य बघून अनेकांचा थरकाप उडाला. पोलिसांनी ममताला ताब्यात घेतले तर किशोरला उपचारासाठी नागपूरला हलविले.
बयाणात विसंगती
ममताच्या म्हणण्यानुसार, किशोर नेहमी त्रास द्यायचा. लग्नाबद्दल विचारले तर तो नकार द्यायचा. मात्र, पोलिस बयाणात तिने प्रेमाचा उल्लेख केला नाही. त्याच्या त्रासाला कंटाळून आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी हल्ला केल्याचे सांगितले. किशोरने ममता आपल्यावर एकतर्फी प्रेम करीत होती. तिला नकार दिला. त्यामुळे तिने जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांना सांगितले. किशोरचा मित्र देवीदास नान्हे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com