तीन टक्‍क्‍यांमुळे भाजप सर्वांत मोठा पक्ष 

राजेश प्रायकर - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिका निवडणुकीत येत्या 21 फेब्रुवारी रोजी शहरातील 20 लाख 93 हजार 391 मतदारांना मतदानाची संधी होती. मागील 2012 मधील निवडणुकीत केवळ 52 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातील 37 टक्के मते घेत भाजप सर्वांत मोठा पक्ष तर 33 टक्के मते घेत कॉंग्रेस दुसऱ्या स्थानावर होता. काल झालेल्या मतदानाची टक्केवारी 53.72 टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. त्यामुळे या टक्केवारीतून प्रमुख राजकीय पक्षांना किती मते मिळतील? याबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांत उत्सुकता आहे. 

महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांचे बळ, त्यांना मिळणारी मते हा सर्वांचाच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. उद्या, 23 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून, पुन्हा राजकीय समीक्षक, नेते मतांची आकडेवारी घेऊन बसणार आहे. यातून पक्ष कुठे कमी पडला, कुठे काय कमी पडले, याचे अंदाज विश्‍लेषकांना तसेच राजकीय पक्षांनाही बांधता येणार आहेत. मागील 2012 मधील निवडणुकीतील आकडेवारीचा विचार केल्यास भाजपने कॉंग्रेसच्या तुलनेत केवळ तीन टक्के मते अधिक घेत सत्ता काबीज केली होती. अर्थात सत्तेसाठी त्यांना सेना, अपक्षांच्या कुबड्यासोबत घ्याव्या लागल्या होत्या. 2012 मध्ये 19 लाख 86 हजार 057 मतदार होते. यातील 10 लाख 32 हजार 762 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2012 मध्ये मतदानाची टक्केवारी 52 टक्के होती. 10 लाख 32 हजार 762 मतांपैकी भाजपला 3 लाख 74 हजारांवर तर कॉंग्रेसला 3 लाख 21 हजारांवर मते होती. टक्केवारीनुसार कॉंग्रेसला 33 तर भाजपला 37 टक्के मते होती. केवळ तीन टक्के मते जास्त घेणाऱ्या भाजपचे 62 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, कॉंग्रेसचे फक्त 41 नगरसेवक निवडून आले होते. तीन टक्‍क्‍यांच्या मतांच्या फरकात भाजपचे 21 नगरसेवक अधिक होते. 

टक्केवारीत फरक; मात्र नगरसेवक सारखेच 
2012 मधील निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा नगरसेवक निवडून आले होते. मात्र, दोघांच्याही मतांमध्ये दोन टक्‍क्‍यांचा फरक आहे. शिवसेनेने 61 हजार 887 मते मिळविली होती तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने 83 हजार 404 मते मिळविली होती. टक्केवारीनुसार सेनेला 6 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 8 टक्के मिळाली होती.

Web Title: The largest party, BJP