वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

हिवरी (जि. यवतमाळ) - वाहनाच्या धडकेत बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना जामवाडी नर्सरीजवळ काल रात्री आठदरम्यान घडली. अंधाराचा फायदा घेऊन वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

यवतमाळ येथून काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यांनी बछड्यास ताब्यात घेतले. वाढत्या उष्म्यामुळे व जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत, त्यामुळे अशा घटना घडत आहेत.

Web Title: leopard death by veehicle dash