महसूलराज्य मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

सुरेश भुसारी
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

नागपूर- यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

विधान परिषदेसाठी येत्या शनिवारला निवडणूक होणार आहे. यात कॉंग्रेसचे शंकर बडे व सेनेचे तानाजी सावंत उमेदवार आहेत. सावंत यांना सेनेसह भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. हे तिन्ही पक्ष एकत्र आल्याने सावंत यांची उमेदवारी मजबूत झाल्याचे बोलले जात होते.

या निवडणुकीत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राठोड यांनी प्रतिष्ठेचा विषय करून सावंत यांना यवतमाळमधून रिंगणात उतरविले आहे. निकालाच्या दिवशी सावंतांनी यवतमाळात येऊच नये, त्यांनी गुलाल पुण्यात उधळावा, असे वचन राठोडांनी दिल्याचे समजते. परंतु राठोड यांच्या विरोधकांनी मोट बांधायला सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. सेनेत राठोड यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाले आहे. भाजपच्या काही नगरसेवकांचा सावंत यांच्या उमेदवारीला विरोध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक कॉंग्रेस उमेदवाराच्या संपर्कात असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या "राठोड विरोधा'मुळे यवतमाळ मतदारसंघातील चित्र आणखी धूसर होत चालले आहे.

संशयित गोव्यात?
सावंत यांच्या विरोधात काहीजणांनी आघाडी उघडली असून काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची कुणकुण राठोड यांना लागली आहे. या दगाफटक्‍याचा धोका लक्षात घेऊन राठोडांनी काही "संशयित' नगरसेवकांना गोव्याला पाठविले आहे. या नाराजांना थेट निवडणुकीच्या दिवशी यवतमाळमध्ये आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात उरलेल्या विरोधकांनी आता गुप्त बैठका घेणे सुरू केले आहे.

विदर्भ

नागपूर -  सरासरीपेक्षा अधिक तीन तास विक्रमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. नदी-नाले दुथडी भरून वाहत...

11.03 AM

वर्धा - कारंजा तालुक्यातील सेलगाव येथील राहत्या घरी कपाटला अचानक विजेचा प्रवाह उतरल्याने त्याच्या झटका बसून आईसह चिमुकलीचा...

10.51 AM

अकोला : सन २०१२ नंतर देशामध्ये सर्वच राज्यात जुलै २०१७ मध्ये पंचवार्षीक पशुगणना होणे अपेक्षीत होते. मात्र, केंद्राचे अनुदान आणि...

09.03 AM