गारपिटीने गहू आडवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

२० जनावरांचा मृत्यू - चंद्रपुरात अवकाळीचा फटका

यवतमाळ/चंद्रपूर - अवकाळीत वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीत तीन हजार हेक्‍टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकरी पुरता गारद झाला. नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेतात उभ्या असलेल्या गहू व हरभरा पिकांकडे बघून शेतकरी समाधान व्यक्त करीत होता. मात्र, गुरुवारी (ता. १६) सायंकाळी वादळवाऱ्यासह आलेल्या गारपिटीने हिरव्यागार स्वप्नांवर पाणी फेरले. शुक्रवारी (ता.१७) सकाळपासून कृषी सहायक व तलाठ्यांनी शेतशिवारात जाऊन नुकसानाच्या पंचनाम्याला सुरुवात केली. घाटंजी तालुक्‍यात सर्वाधिक गहू, हरभरा पिकांचे जवळपास २,२०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ नेर, दारव्हा, झरी, कळंब, दिग्रस, उमरखेड, दारव्हा आदी तालुक्‍यांत गहू, हरभरा, आंबा, संत्रा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीत २० जनावरांचा मृत्यू झाला. घाटंजी तालुक्‍यातील वाढोणा, सोनखास येथील १५ जनावरांचा समावेश असून, ८५० घरांची पडझड झाली आहे. वणी तालुक्‍यात १३ घरांचे नुकसान झाले. 

चंद्रपूर - गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. घराची भिंत पडल्याने सात जनावरे मृत्युमुखी पडली. घरावरील टिनपत्रे उडाली. हातचे रब्बी पीक गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

Web Title: loss by hailstorm