अकोल्यात कमी टक्केवारीने उमेदवारांची उडाली झोप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

अकोला - अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कमी मतदान झाल्याने अनेक प्रभागांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्‍यता आहे. गेल्या महिनाभरापासून मोठा गाजावाजा करीत उमेदवारांनी निवडणुकीचे मैदान गाजविण्यासाठी पाण्यासारखा खर्च केला. मात्र, हद्दवाढीनंतर प्रभागाचा अवाढव्य झालेला विस्तार आणि त्यातही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या अनेक प्रभागांतील मतदारांनी दाखवलेल्या निरुत्साहामुळे मतांची घटलेली टक्केवारी उमेदवारांची झोप उडविणारी ठरली आहे. 

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.21) 20 प्रभागांतील 80 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनासह उमेदवारांनी जिवाचे रान केले. मात्र, अनेक प्रभागांतील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास निरुत्साह दाखविला. त्यामुळे कमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे गुरुवारी (ता.23) जाहीर होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार असून, उमेदवारांसह मतदारांनाही निकालाची उत्सुकता लागली आहे.