महादेव जानकरांची उच्च न्यायालयात धाव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने दाखल केलेला गुन्हा तसेच वडसा देसाईगंज प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. 16) सुनावणी होईल.

नागपूर - राज्य निवडणूक आयोगाने दाखल केलेला गुन्हा तसेच वडसा देसाईगंज प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता. 16) सुनावणी होईल.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपला पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कपबशी हेच निवडणूक चिन्ह द्यावे, अशी मागणी जानकर यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असे मोबाईलवरील संभाषणातून पुढे आले होते. याशिवाय कॉंग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनादेखील जानकरांनी दिल्या होत्या. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून जानकरांना नोटीस बजावण्यात आली. तसेच 24 तासांमध्ये उत्तर देण्याची सूचना करण्यात आली होती. यानंतर आपण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नसल्याचे स्पष्टीकरण जानकरांनी जाहीर पत्राद्वारे दिले होते. मात्र, निवडणूक आयोगाने जानकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच वडसा देसाईगंज जेएमएफसीने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जानकरांनी निवडणूक आयोग व जेएमएफसीच्या आदेशावर अंतरिम स्थगितीदेखील मागितली आहे.

विदर्भ

अंध विनोद उकेची कैफियत - एंजिओग्राफीसाठी पाच हजार कोठून आणू? नागपूर - सुपर स्पेशालिटीत आमदार गिरीश व्यास रुग्णांच्या...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

विजेच्या धक्‍क्‍याने घेतला मुलांचा बळी नागपूर - उच्चदाबाच्या विद्युत तारांमुळे सुगतनगरमधील दोन जुळ्या भावांच्या मृत्यूला...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सिमेंट रस्त्यांवरून वृद्ध, गर्भवतींचा प्रवास धोक्‍याचा नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते करण्यास महापालिकेने...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017