यमदूत हटविले; महाराजबाग मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नागपूर - रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक वीजखांबांची समस्या "सकाळ'ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महाराजबाग मार्गावरील यमदूत तातडीने हटवून घेतल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. 

नागपूर - रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक वीजखांबांची समस्या "सकाळ'ने उजेडात आणताच प्रशासन खडबडून जागे झाले. महाराजबाग मार्गावरील यमदूत तातडीने हटवून घेतल्याने या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या नागपूर शहरात रस्ते रुंदीकरण व सिमेंटीकरणाचा धडाका सुरू आहे. कधी रस्त्याच्या कडेला असलेले शेकडो वीजखांब आता रस्त्याच्या मधोमध आले आहेत. यापूर्वीही रस्त्याच्या मध्ये असलेल्या वीजखांबांना वाहन धडकून प्राणांतिक अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यानंतरही संबंधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मांजराने डोळे मिटून दूध प्यावे या प्रमाणे वीजखांब तसेच उभे ठेवून शहरात नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत. 

याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने खांब हटविण्याची कारवाई सुरू केली. गॅसकटरच्या साहाय्याने खांब कापून टाकले आहेत. यामुळे संभाव्य धोका टळला आहे. हीच तत्परता अन्य मार्गांसाठीही दाखविण्याची गरज आहे. 

70:30 या प्रमाणात वाटा 
महाराजबाग मार्गावरील वीजखांब सर्वाधिक धोकादायक ठरले होते. या मार्गावरील खांब हटविण्यासाठी महावितरणने मनपाला दीड कोटीची डिमांड दिली होती. परंतु, मनपाने पैसे दिले नाहीत. शासनाने आपल्या अधिकारात मनपा आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार घडवून आणला. त्यानुसार कॉंग्रेसनगर विभागातील रस्त्यावर असलेले खांब हटविण्यासाठी 4.82 कोटींचा खर्च अपेक्षित असून, 70:30 या प्रमाणात दोन्ही यंत्रणा वाटा देणार आहेत. 

Web Title: Maharahbaug