'उन्हाळ्यात पुरेसा पाणीपुरवठा करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

नागपूर - उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा व्हायला हवा. पाण्यासंदर्भात महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांमार्फत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याकरिता तक्रार कक्ष सक्षम करण्यात यावे, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी दिल्या. 

नागपूर - उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा व्हायला हवा. पाण्यासंदर्भात महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांमार्फत नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्याकरिता तक्रार कक्ष सक्षम करण्यात यावे, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी दिल्या. 

नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर विचार करून निर्णय घेण्यासाठी बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतील डॉ. पंजबाराव देशमुख स्मृती सभागृहात झोननिहाय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिचकार म्हणाल्या, नागरिकांना पाण्याच्या बाबतीत कोणताही त्रास होणार नाही, यासाठी विशेष लक्ष ओसीडब्ल्यूच्या प्रशासन यंत्रणेने घ्यावे. पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पार पाडावी. दूषित पाणी समस्या तातडीने सोडवावी. वाढत्या पाण्याच्या बिलासाठी ठोस उपाययोजना आखण्यात येऊन पाणी ग्राहकांना सवलत देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देशही महापौरांनी दिले. 

बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष उपनेत्या मायाताई इवनाते, सत्तापक्ष उपनेते वीरेंद्र कुकरेजा, मुख्य प्रतोद दिव्या धुरडे, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, संबंधित झोनचे सर्व नगरसेवक तसेच ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. 

नगरसेवकास 10 हजारांचे बिल! 
बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने आपल्यास तब्बल 10 हजार रुपयांचे बिल पाठविल्याचे निदर्शनास आणून दिले. हे बिल तीन महिन्यांचे आहे. याचा अर्थ महिन्याला तीन हजार रुपये पाणीपट्टी आकारली जात आहे असा होतो. बिल कोण पाठवतो, त्याचे रीडिंग कोण घेतो, असे अनेक प्रश्‍न यामुळे निर्माण होतात. आपण नगरसेवक असल्याने कदाचित बिलात दुरुस्ती केली जाईल, मात्र सर्वसमान्यांचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: Make enough water in the summer