दरोड्याचे तार जुळले चेन्नईला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम बॅंकेवर दरोडा टाकून 30 किलो सोन्यासह साडेनऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. या धाडशी दरोड्याचे कनेक्‍शन चेन्नई, तमिळनाडूशी जुळत असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे. यापूर्वी हुडकेश्‍वर पोलिसांनी दिल्लीतील एका दरोडेखोरांची टोळीला जीव धोक्‍यात टाकून जेरबंद केले होते. यातील अटकेतील एक महिला आरोपी प्रियांका ठाकूर हिने जरीपटका हद्दीतील मणप्पुरम गोल्ड लोन शाखेत रात्रीला कटरने शटर तोडून दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मणप्पुरम कार्यालयाला सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.

नागपूर - जरीपटक्‍यातील मणप्पुरम बॅंकेवर दरोडा टाकून 30 किलो सोन्यासह साडेनऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला. या धाडशी दरोड्याचे कनेक्‍शन चेन्नई, तमिळनाडूशी जुळत असल्याची विश्‍वसनीय माहिती मिळाली आहे. यापूर्वी हुडकेश्‍वर पोलिसांनी दिल्लीतील एका दरोडेखोरांची टोळीला जीव धोक्‍यात टाकून जेरबंद केले होते. यातील अटकेतील एक महिला आरोपी प्रियांका ठाकूर हिने जरीपटका हद्दीतील मणप्पुरम गोल्ड लोन शाखेत रात्रीला कटरने शटर तोडून दरोडा टाकण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्याची कबुली दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मणप्पुरम कार्यालयाला सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हा सर्व प्रकार लुटीला गेलेल्या सोन्याच्या "इन्शुरन्स'मधून तर घडला नसावा, अशी चर्चा आहे. 

सहा महिन्यांपूर्वी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याचे तत्कालीन एपीआय किरण चौगुले यांनी दिल्लीतील दरोडेखोरांची टोळी गजाआड केली होती. यात एका महिलेसह चौघांचा समावेश होता. यातील दोन मुख्य आरोपी दरोडेखोर फरार झाले होते. फरार आरोपीत महिला आरोपीचा प्रियकर विक्रांत याचा समावेश होता. त्याला अटक करण्यात शेवटपर्यंत हुडकेश्‍वर पोलिसांना यश आले नाही. प्रियकरानेच आपल्याला बोलताना आपले तमिळनाडू आणि चेन्नई येथील काहींशी संबंध असल्याचे प्रियांका हिने सांगितले होते. जरीपटक्‍यातील मणप्पुरम बॅंकेत मोठी रक्‍कम आणि किलोने सोने ठेवल्या जाते, अशी माहिती त्या दरोडेखोरांना होती. सध्या अटकेतील आरोपी प्रियांका आणि तिचा सहकारी जामिनावर बाहेर आहे. याच दिल्लीतील टोळीने हा दरोडा घडवून तर आणला नाही. अशी चर्चा आहे. दरोड्यात गेलेल्या सोन्याच्या इन्शुरन्सशी काही संबंध आहे का? या दिशेनेही आता पोलिस तपास करीत आहेत. 

आरोपींना गजाआड करण्याचा प्रयत्न 
देशभरातील मणप्पुरम कंपनीच्या अनेक शाखा आहेत. यातील बऱ्याच शाखेत यापूर्वी दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात यापूर्वी दरोड्याचा झालेला प्रयत्न बघता शहर पोलिस चक्रावून गेली आहे. राज्याच्या सीसीटीएनएस प्रकल्पाचा वापर करून आरोपींना गजाआड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती आहे.