माओवाद्यांनी लावली लाकूड डेपोला आग 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

गडचिरोली, - सशस्त्र माओवाद्यांनी मंगळवारच्या मध्यरात्री चामोर्शी तालुक्‍यातील घोट येथील लाकूड डेपोला आग लावली. 

या आगीत सुमारे १ कोटी ६७ लाख रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळून राख झाले. गेल्या महिन्यात माओवाद्यांनी अहेरी तालुक्‍यातील तलवाडा येथील वन डेपोतील मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड जाळले होते. त्यानंतर जाळपोळीची ही  दुसरी मोठी घटना आहे.

मंगळवारी (ता.१७) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास २० ते २५ सशस्त्र माओवादी घोट येथील लाकूड डेपोत गेले. त्यांनी केरोसीन ओतून बांबू व लाकडांना आग लावली. या आगीत बांबू, साग व अन्य प्रजातींच्या लाकडांचे सुमारे १ कोटी ६७ लाख रुपयांच्या मालमत्तेचे  नुकसान झाल्याचा अंदाज 

वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास गडचिरोली व अहेरी येथील अग्निशमन वाहन तसेच आलापल्ली येथील वनविभागाचे वाहन घटनास्थळी पोचले.

त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बरीच लाकडे जळून राख झाली होती. ही लाकडे बिट जंगल कामगार सहकारी संस्थांचे असल्याची माहिती आहे.

घटनास्थळी कसनसूर एरिया कमिटीच्या माओवाद्यांनी पत्रकेही टाकली. ३० मार्चला एटापल्ली तालुक्‍यातील रेकनार-हुमडी येथील जंगलात झालेली पोलिस-नक्षल चकमक बनावट असून, सोनू उसेंडी यास खोट्या चकमकीत ठार केल्याचा आरोप माओवाद्यांनी
केला आहे. वनाधिकाऱ्यांनी या घटनेची तक्रार घोट पोलिस ठाण्यात केली आहे.

Web Title: The Maoists burned firewood depo