नागपूर अधिवेशनावर मराठ्यांची धडक

मंगेश गोमासे, अंकुश गुंडावार, अनिल कांबळे, निखिल भुते
बुधवार, 14 डिसेंबर 2016

कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षण आदी मागण्यांसाठी आज (बुधवार) नागपुरात भव्य मराठा- कुणबी समाजाचा भव्य असा क्रांती मुकमोर्चा काढण्यात आला. तरुणी आणि महिलांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्च्यात हजारोंचा मूक एल्गार नागपूरकरांनी अनुभवला. अतिशय शिस्तीत यशवंत स्टेडियमकडून विधानभवनाच्या दिशेने मोर्च्याने कूच केले.

कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षण आदी मागण्यांसाठी आज (बुधवार) नागपुरात भव्य मराठा- कुणबी समाजाचा भव्य असा क्रांती मुकमोर्चा काढण्यात आला. तरुणी आणि महिलांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्च्यात हजारोंचा मूक एल्गार नागपूरकरांनी अनुभवला. अतिशय शिस्तीत यशवंत स्टेडियमकडून विधानभवनाच्या दिशेने मोर्च्याने कूच केले.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा- कुणबी बांधव नागपुरात दाखल झाला. जवळपास दीड महिन्यांपासून सुरू असलेली मोर्च्याबद्दलची जनजागृती फळाला आल्याची प्रचिती आली. सकाळपासून यशवंत स्टेडियमवर समाज बांधवांनी एकत्र यायला सुरुवात केली. यशवंत स्टेडियमच्या आत आणि बाहेरही समाज बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था होती. शिस्त असली तरीही प्रत्येकाच्या डोळ्यात कोपर्डीच्या घटनेबद्दलचा तीव्र संताप दिसत होता. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांवरही या मोर्चाचे पडसाद उमटले. दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी याच मुद्यावरून तहकूबही झाले. विशेष म्हणजे एकीकडे मुक मोर्चा निघाला असताना दुसरीकडे विधानपरिषदेत मराठा आरक्षणावरील चर्चा सुरू होती.

मोर्च्याचे नेतृत्व करणाऱ्या तरुणींनी जिजाऊ वंदन करून मोर्च्याला संबोधित केले. त्यांच्या शब्दांची धार आणि डोळ्यांतील हुंकार मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाढविणारे ठरले. व्यासपीठावरील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून तरुणींनी दीपप्रज्वलन केले आणि मोर्चाला प्रारंभ झाला. हाती भगवे झेंडे, डोक्‍यावर "मराठा क्रांती मोर्चा' लिहिलेली टोपी व अंगात काळे टी-शर्ट घातलेले युवक अत्यंत शांतपणे मोर्चात चालत होते. मोर्चेकऱ्यांच्या हातात "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "कोपर्डी घटनेचा निषेध' आदी फलक होते. हुसंख्य युवक-युवतींनी काळे टी-शर्ट परिधान केले होते. "सातबारा कोरा करा', "भिक नाही हक्क मागतोय', "मुला बाळांना अनाथ करू नका' अशा घोषणांच्या टोप्या घातलेले चिमुकले नाशिकहून दाखल झाले. त्र्यंबकेश्‍वरच्या आधारतीर्थ अनाथाश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ही मुले या मोर्च्यात सहभागी झाली.

- 950 पोलिस, एसआरपीच्या आठ तुकड्या
- आयोजकांतर्फे 20 व्हिडीओ कॅमेरे
- मोर्च्याच्या मार्गावर 250 वाहतूक पोलिस
- हेल्मेट कॅमेऱ्याचा पहिल्यांदा प्रयोग
- 10 रुग्णवाहिका, प्रत्येक चौकात प्रथमोपचाराची उपलब्धता
- मोर्चावर ड्रोनद्वारे नजर
- मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी स्वंयसेवक
- आठ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
- स्वंयसेवी संस्थांतर्फे मोर्चेकऱ्यांना पाणी पाऊचे वाटप
- फेसबूक, ट्विटर व ऍपद्वारे मोर्च्याचे थेट प्रेक्षपण
- प्रत्येक चौकात एलईडी स्क्रीन
- वकील काळ्या कोटात तर डॉक्‍टर ऍप्रॉनमध्ये सहभागी झाले
- मोर्चेकऱ्यांच्या डोक्‍यावर मराठा-कुणबी लिहिलेल्या टोप्या
- गळ्यात दुपट्टे, अंगात काळे, पिवळे, भगवे टी-शर्ट, हातात भगव्या पताका घेतलेले मोर्चेकरी
- मावळ्यांची पारंपरिक टोप्यांची यशवंत स्टेडीयमसोर विक्री
- "जगदंब, मराठा क्रांती, शिव छत्रपती, क्षत्रीय कुलसंवत' असे टॅटू अनेकांच्या हातावर दिसून आले
- पारंपरिक वेशभुषेत चिमुकल्यांचा सहभाग
- चौका-चौकांत चोख पोलिस बंदोबस्त
- अखिल कुणबी समाजतर्फे अल्पोहाराची व्यवस्था
- कचरा उचलण्यासाठी स्वयंसेवक राबत होते.
- जिजाऊ वंदनेने मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ
- कोपर्डी हत्याकांडातील पीडितेला श्रद्धांजली

विदर्भ

नागपूर - कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर जनावरे नेली जात असल्याच्या माहितीवरून सदर पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे गड्डीगोदाम...

01.15 PM

स्थनगप्रस्तावावर प्रथमच मतदान - सत्ताधाऱ्यांवर संवेदनाहीनतेचा विरोधकांचा आरोप  नागपूर - शुक्रवारी रात्रभर झालेल्या...

01.15 PM

नागपूर - वडसा वनविभागातून बंदिस्त करून गोरेवाडा रेस्क्‍यू सेंटरमध्ये सध्या मुक्कामी असलेल्या वाघिणीची मुक्तता करण्याचा समितीच्या...

01.15 PM