भाजप सरचिटणीस आमदार कुटे यांच्या वाहनाला अपघात

Accident-buldhana
Accident-buldhana

बुलडाणा : भाजप प्रदेश सरचिटणीस तथा जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे नागपूर शुक्रवारी (ता.15) जळगाव जामोद येथे दुपारी येत असताना नागपूर ते अमरावती महामार्ग क्रमांक सहा वरील कारंजा घाडगे गावानजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली. याबाबत प्राप्त माहिती अशी की, हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूर येथे गेलेले आमदार डॉ. संजय कुटे हे त्यांच्या खासगी वाहनाने अधिवेशनाला शनिवार व रविवारी सुट्टी असल्यामुळे जळगाव जामोद येथे तीन सहकाऱ्यांसोबत परत येत असताना शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजेदरम्यान समोरुन दुचाकी वाहन भरधाव येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहन रस्त्याच्याकडेला गेले. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, अशी परिस्थिती असतानाही घसरलेल्या दुचाकीस्वार युवकांना त्यांनी कारंजा घाडगे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल त्यांच्या वैद्यकीय उपचाराबाबत तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांना सांगितले. 

अपघात झाल्यानंतर महामार्गावरील इतर वाहनधारकांनी त्यांना मदत केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे स्वीय साहाय्य डॉ. इक्बाल शेख, वाहन चालक गजानन धामोडे हे होते. दरम्यान, कारंजा घाडगे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रात्री उशिरा आमदार कुटे सहकार्यांसोबत जळगाव जामोद येथे पोचले व सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी सुखरूप असून चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने बचावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com