खत विक्रेत्यांना कृषी पदविका : वऱ्हाडातील पहिलाच प्रयोग यशस्वी

अनुप ताले
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

४० जागांकरिता ५८ प्रवेश अर्ज; २० आॅगस्टपासून दर रविवारी भरतो वर्ग 

कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव) यांची केवळ प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात आली. उपक्रमाची सर्व जबाबदारी आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयाकडे आहे. आत्मा कार्यालयाने छाणनीअंती पात्र ठरविलेल्या ४० लोकांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला असून, दर रविवारी अभ्यासवर्ग होतात. 
- डॉ. उमेश ठाकरे, कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव), अकोला

अकोला ः कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली. त्यानुसार वऱ्हाडातील पहिलाच प्रयोग म्हणून, अकोला जिल्ह्यात केवळ कृषी विज्ञान केंद्र अकोला, येथे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षी ५८ प्रवेशअर्ज प्राप्त झाले असून, मंजूरीनुसार ४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासह दररविवारी याठिकाणी नियमित शिकवणी वर्गसुद्धा भरत आहेत. 

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंध संस्थान (MANAGE), हैद्राबाद, या राष्ट्रीय संस्थेद्वारा ‘डीएईएसआय’ (Diploma in Agriculture Extension Services for Input Dealers) हा एक वर्षीय कृषी पदविका अभ्यासक्रम अकोल्यात यंदापासून सुरु करण्यास शासन मान्यता मिळाली. यापूर्वी राज्यातील केवळ चार जिल्ह्यांमध्ये या अभ्यासक्राला मान्यता देण्यात आली होती. यंदा नव्याने अकोला, बुलडाणा, गोंदीया, गडचिरोली, असे एकूण ९ जिल्ह्यांमध्ये २२ मे रोजी मान्यता देण्यात आली. या पदविकेचा मुख्य उद्देश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी विस्तार कार्यात सक्षम बनविणे असून, टप्प्याटप्‍याने याची व्याप्ती वाप्ती वाढविली जाणार आहे. त्यानुसार सत्रातील पहिला प्रयोग म्हणून, अकोला जिल्ह्यात इच्छूकांकडून १० जुलै २०१७ पर्यंत आवेदनपत्र मागविण्यात आले होते.

केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांनाच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असल्याने, मंजूर ४० जागांसाठी किती व्यावसायीक आवेदन भरतील, याची कृषी शिक्षण विभागात साशंका होती. मात्र, जिल्ह्याभरातून ५८ लोकांनी प्रवेशाकरिता आवेदन भरल्याने, हा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे मंजूर प्रवेश मर्यादेनुसार ४० जागांवर प्रवेश निश्चिती करून, २० जुलै २०१७ पासून कृषी विज्ञान केंद्र, सिसा (उदेगाव) येथे दर रविवारी अभ्यासवर्ग सुरू झाले आहेत. अभ्यासवर्ग घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्राध्यापकांना पाचारन करण्यात येते. प्रवेश घेतलेल्या लोकांमध्ये ६० ठी ओलांडलेले विद्यार्थीसुद्धा असल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई