सिलिंडर स्फोटामुळे झोपडपट्टीला आग 

सिलिंडर स्फोटामुळे झोपडपट्टीला आग 

अकोला - रामदासपेठ पोलिस ठाण्याला लागून असलेल्या मातानगरात सिलिंडर स्फोटामुळे सुमारे 40 घरांना गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. यात सिलिंडरचा लागोपाठ स्फोट होऊन झोपड्या जळून खाक झाल्या. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून ती आटोक्‍यात आणली. 

मातानगरमध्ये एकाला लागून एक घरे आहेत. ही सर्व घरे कुळाची आहेत. यातील एका घरात सिलिंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीने इतक्‍या झपाट्याने दुसऱ्या घराला आपल्या कवेत घेतले, की त्या घरातील सिलिंडरचाही आगीमुळे स्फोट झाला. अशाप्रकारे या झोपडपट्टीमध्ये पाहता पाहता क्षणार्धात सिलिंडरचे स्फोट होऊन ती आग संपूर्ण परिसरात पसरली. या आगीमध्ये घरे जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी जवळच असलेल्या नाल्यातील घाणपाण्याचा प्रयोग केला, तर काहींनी पाणीपाऊच आगीत फेकून ती विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तेवढ्यात अग्निशमन दलाच्या एकापाठोपाठ एक गाड्या आल्या. आग विझवत त्यांनी फुटलेले सिलिंडरही बाहेर काढले. दुसरीकडे आग लागताच घरात राहणारे नागरिकही मुलाबाळांसह घराबाहेर आले. घटनास्थळाजवळ असलेल्या रामदासपेठ पोलिसांनीही तातडीने हालचाली करत जमा झालेल्या नागरिकांना दूर केले. सुदैवाने याला लागून असलेल्या पोलिस निवासस्थानापर्यंत आग पोचली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com